(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Railway : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! गणपती उत्सवासाठी रेल्वेच्या 214 विशेष गाड्या; रेल्वेमंत्र्यांची माहिती
Indian Railway : जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत.
Indian Railway : गणपती उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. या सणानिमित्त लोक आपापल्या घरी जातात. अशा चाकरमानींच्या सोयीसाठी रेल्वेने गणपती उत्सव विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गणपती उत्सव, होळी, दिवाळी, दुर्गापूजा आदी मोठ्या सणांना विशेष गाड्या चालवल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एकूण 214 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या तपशीलाबद्दल जाणून घ्या
Ganpati Bappa Morya
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) July 2, 2022
214 trains planned for the ensuing Ganpati Festival 2022.
रेल्वेमंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिली
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून लोकांना माहिती दिली की, गणपती उत्सवाच्या विशेष प्रसंगी रेल्वे लोकांच्या सोयी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवण्याचा विचार करत आहे. या विशेष प्रसंगी रेल्वेकडून एकूण 214 गाड्या चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्याची सोय होणार असून सणानिमित्त लोकांना सहज आपल्या घरी जाता येणार आहे.
वेळापत्रक लवकरच जाहीर होईल
रेल्वेने सध्या 214 गणपती महोत्सव गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अद्यापपर्यंत या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. लवकरच रेल्वे या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करेल आणि त्यानंतर या गाड्यांचे आरक्षण सुरू होईल. या गाड्या जुलैअखेर ते ऑगस्टपर्यंत चालवण्यात येतील
संबंधित बातम्या :
शिवसेना एक.... व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी
Vidhansabha Speaker : विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी मैदानात, नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी लढत