![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vidhansabha Speaker : विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी मैदानात, नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी लढत
Maharashtra Vidhansabha Speaker Election : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे.
![Vidhansabha Speaker : विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी मैदानात, नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी लढत Maharashtra Politics Political Crisis LIVE Vidhansabha Speaker Election Rahul Narvekar vs Rajan Salvi BJP Maha vikas aghadi shiv sena Vidhansabha Speaker : विधानसभा अध्यक्षपदासाठी मविआकडून राजन साळवी मैदानात, नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी लढत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/02/87ed060aa76024a9216d892bfc7abf34_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Politics LIVE Updates : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपनं राहुल नार्वेकरांना संधी दिली आहे. मात्र महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
राजन साळवी यांना नुकतंच शिवसेनेचं उपनेतेपद दिलेलं आहे. या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात गेले असताना राजन साळवी हे निष्ठावान म्हणून शिवसेनेतच राहिले. यामुळंच त्यांना ही संधी मिळाल्याचं बोललं जात आहे. साळवी यांचा अर्ज भरतेवेळी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील प्रभू हे उपस्थित होते.
कोकणातील शिवसेनेचं निष्ठावान नेतृत्व राजन साळवी (Know About Rajan Salvi)
राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत.
साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत.
2009 पासून सलग तीन वेळा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
कोण आहेत राहुल नार्वेकर (Know About Rahul Narvekar)
शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात
तीन वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य
2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश
2019 साली कुलाबा मतदारसंघातून आमदार
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकरांचे जावई
बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवाराची घोषणा झालेली नव्हती. शेवटी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करुन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब केला. नवनियुक्त शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या अधिवेशनात होणार आहे. त्याआधी उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. शिंदे गट आणि भाजपच्या बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Rahul Narvekar : भाजपकडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)