(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sputnik V Corona Vaccine | रशियाच्या कोरोना वॅक्सिनचं उत्पादन भारतात होणार? रशिया भागीदारी करण्याच्या तयारीत
Corona Vaccine Update : जगातील पहिली कोरोनावरील प्रभावी लस तयार केल्याचा दावा करणारा रशिया लसीचं उत्पादन करण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचा विचार करत आहे.
नवी दिल्ली : जगातील पहिली कोरोनावरील प्रभावी लस तयार केल्याचा दावा करणारं रशिया भारतासोबत भागीदारी करण्यासाठी इच्छुक आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने कोरोनावरील प्रभावी वॅक्सिन तयार केल्याचा दावा करत लसीला मंजूरीही दिली होती. रशियाने भारतात कोरोनावरील औषध 'स्पुतनिक 5' चं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची इच्छा दर्शवली आहे. रशियन थेट गुंतवणूक निधी (आरडीआयएफ)चे मुख्य अधिकारी (सीईओ) किरिल दमित्रिव म्हणाले की, रशिया कोविड-19चं वॅक्सिन 'स्पुतनिक 5' चं उत्पादन करण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचा विचार करत आहे.
एका ऑनलाईन संमेलनात बोलताना दमित्रिएव म्हणाले की, 'लॅटिन अमेरिकन, आशिया आणि पश्चिम आशियाचे अनेक देश लसीचं उत्पादन करण्यासाठी इच्छुक आहेत. ते पुढे बोलताना म्हणाले की, 'या लसीचं उत्पादन करणं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सध्या आम्ही भारतासोबत भागीदारी करण्यावर विचार करत आहोत. लस उत्पादन करण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण लसीचं उत्पादन करण्यासाठी होणारा हा करार लसीची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षण बनवणार आहे. रशिया आंतरराष्ट्रीय सहभागाची आशा करत आहोत.'भारतात कधी आणि केव्हा येणार रशियन कोरोना वॅक्सिन?
रशियाने कोविड-19 वॅक्सिनचं उत्पादन सुरु केलं
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी घोषणा केली होती की, रशियाने कोविड-19 वर प्रभावी लस तयार केली आहे. ही लस अत्यंत प्रभावी पद्धतीने काम करत असून त्यांच्या मुलीलाही ही लस देण्यात आली होती. त्यानंतर रशियाने आपल्या लसीच्या पहिल्या बॅचचं उत्पादन सुरु केलं आहे.
पंतप्रधान मोदींकडून स्वातंत्र्यदिनी भारतीय कोरोना वॅक्सिनचा उल्लेख; जाणून घ्या कधीपर्यंत येणार?
रशियाचं वॅक्सिन गामालेया साइंटिफिक रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी अॅन्ड मायक्रोबायोलॉजीद्वारे तयार करण्यात आलं आहे. ही मॉस्कोजवळील एक आरोग्य संस्था आहे. दरम्यान, या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत.
गमालेया इंस्टिट्यूटनुसार, ते डिसेंबर आणि जानेवारीपर्यंत प्रत्येक महिन्याला 50 लाख वॅक्सिन उत्पादन करण्याची क्षमता आहे. रशियाने दावा केला आहे की, त्यांना जगभरातील अनेक देशांकडून वॅक्सिनचे ऑर्डर मिळाले आहेत. या वॅक्सिनला 'स्पुतनिक V' असं नाव देण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- गूड न्यूज...! कोरोनावरील जगातील पहिली लस बनवल्याचा रशियाचा दावा; अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची घोषणा
- कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी भारतातील 'या' कंपन्यांचे प्रयत्न; कधीपर्यंत येण्याची शक्यता?
- सीरम इन्स्टिट्यूटची कोविड लस फक्त 225 रुपयांत मिळणार; गेट्स फाउंडेशनचा पुढाकार
- कोरोनावरील लस येण्यासाठी अजून किमान सहा महिने लागतील : अदर पुनावाला
- Coronavirus | कोरोना लसची प्राथमिक मानवी चाचणी यशस्वी, अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा दावा