Serum Institute | सीरम इन्स्टिट्यूटची कोविड लस फक्त 225 रुपयांत मिळणार; गेट्स फाउंडेशनचा पुढाकार
गरिब देशांना स्वस्तात कोविड लस उपलब्ध करुन देण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने भारतातील लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटशी करार केला आहे. या माध्यमातून केवळ कोविड लस केवळ 3 डॉलरला म्हणजे 225.20 भारतीय रुपयांना उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली : गेट्स कुटुंब पुन्हा एकदा गरिबांसाठी धावून आले आहेत. गरीब देशातील नागरिकांना स्वस्तात लस उपलब्ध व्हावी यासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटशी करार केला आहे. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांकरिता कोविड19 लसचे 100 दशलक्ष डोस तयार करण्यासाठी गवी आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन पुढाकार घेतला आहे.
सीरम इन्स्टिट्यूट गवी आणि बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या मदतीने अवघ्या तीन डॉलरमध्ये ही लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट असे 100 दशलक्ष डोस तयार करणार आहे. सध्या सीरम संस्थेने यूकेच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी भागीदारी आहे.
...तर डिसेंबर महिन्यात कोरोनाची लस येईल कोरोनावर लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात या लशीचं उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केलं जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी दिली आहे.
सुरुवातीला कोणतीही लस बल्कमधे (मोठ्या प्रमाणात ) बनवली जाते. त्याप्रमाणे ही लस देखील बल्कमधे बनून तयार आहे. आणखी काही प्रक्रिया झाल्या की ही लस बाटल्यांमधे भरणे सुरु करणार आहोत. या लसीच्या भारतीय लोकांवरही चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल. 1500 भारतीय लोकांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत, असं राजीव ढेरे यांनी सांगितलं.
Corona Vccine | 'या' भारतीय कंपनीचा कोरोना लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी
ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून सुरु असलेले प्रयोग, भारतातील पंधराशे लोकांवर सुरू असलेल्या चाचण्या आणि कायदेशीर सोपस्कार नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे डिसेंबर महिन्यात किंवा थोड्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही लस लोकांना उपलब्ध होऊ शकते. कदाचित ही लस इंग्लंडमध्ये सुरुवातीला थोडीशी आधी उपलब्ध होऊ शकते. पण आपल्याकडे या लशीचे कोट्यावधी डोस आम्ही बनवून तयार ठेवत आहोत. त्यामुळे ती सगळ्यांना लगेच उपलब्ध होईल. मी शास्त्रज्ञ आहे आणि आतापर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयोगाची प्रगती पाहता आपण कोरोना लसीच्या 90 ते 95 टक्के जवळ पोहोचलो आहोत, असा दावा राजीव ढेरे यांनी केला आहे.
Corona vaccine| Dr Rajeev Dhere| सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार झालेली कोरोना लस भारतीयांना कधी मिळणार?