एक्स्प्लोर

26 November In History : दहशतवादी हल्ल्यानं हादरली होती मुंबई; संविधानही आजच्याच दिवशी लागू झालं; हा दिवस इतिहासात महत्वाचा

Dinvishesh 26 November : आजच्याच दिवशी 2008 साली दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. आज इतिहासात अजून काय घडलं होतं?

On This Day In History : अनेकांची दिवसाची सुरुवात ही दिनविशेष वाचनाने होते. आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्यावाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. दिग्गजांचा जन्म-मृत्यू या नोंदींसह इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 26 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या.  आजच्याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यात शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. आजच्याच दिवशी भारतानं संविधान स्विकारलं होतं, त्यामुळं आपण हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो.  आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

2611 च्या जखमा ; मुंबईवर भीषण हल्ला, शेकडो मृत्यू, अनेकजण जखमी (Mumbai Attack) 

2008 :  26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं. आजही दहा वर्षानंतर या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. मुंबई पोलीस, एटीएस अधिकारी, एनएसजी कमांडो, मार्कोस, अग्निशमन जवानांनी प्राण पणाला लावत नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर तुकाराम ओंबळे यांनी स्वत:चा जीव देऊन अजमल आमीर कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडलं. कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. 26/11 चा दहशतवादी हल्ला हा भारतावरील सर्वात भीषण हल्ला होता. 26 नोव्हेंबर, 2008 रोजी शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानातील दहा दहशतवादी कराचीहून समुद्रामार्गे बोटीने मुंबईत घुसले होते. या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, ताजमहल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी सुमारे 60 तास धुमाकूळ घातला आणि या हल्ला 166 पेक्षा जास्त निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होती. मृतांमध्ये 28 परदेशी नागरिकांचा समावेश होता.

1921 : Verghese Kurien : धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्म (National Milk Day)

भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉ. वर्गीस कुरियन (Verghese Kurien) यांचे नाव घेतले जाते. दुग्ध उत्पादनात भारताला अग्रेसर बनवण्यात कुरियन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. देशात 'दुधाचा महापूर' योजनेची संकल्पना त्यांनीच मांडली. कुरीयन यांचा जन्मदिवस 'नॅशनल मिल्क डे' (National Milk Day) म्हणून साजरा केला जातो.  डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 मध्ये झाला होता.  दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 'एनडीडीबी' ने 'ऑपरेशन फ्लड' (धवल क्रांती) सुरु केलं. अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला.  डॉ. कुरियन यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.  डॉ.कुरियन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 हून अधिक संस्थाची स्थापना केली. त्यांना रेमन मॅगसेसे, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यासारख्या मानाच्या नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. डॉ.कुरियन यांचं 9 सप्टेंबर 2012  रोजी निधन झाले. 

Constitution Day : संविधान दिन 
देशभरात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाचा स्वीकार करुन 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. जगभरातील संविधान बारकाईने वाचल्यानंतर, त्यांचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो भारतीय संविधान सभेसमोर मांडला. याच दिवशी संविधानाने तो स्वीकारला. 19 नोव्हेंबर 2015 रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने नागरिकांमध्ये संविधानाच्या मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 26 नोव्हेंबरला 'संविधान दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो.
 
1960 : कानपूर आणि लखनौ  STD सेवा सुरु 
आजकाल तर आपल्याकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी असलेली संपर्क साधनं आली आहेत. मोबाईलमुळं आपण जगातील कुठल्याही भागात असलेल्या व्यक्तीशी काही सेकंदात संवाद साधू शकतो. काही दशकांपूर्वी मात्र फोनची सुविधा श्रीमंत लोकांसाठीच होती. मात्र 1960 साली STD च्या माध्यमातून ही सुविधा सामान्यांनाही प्राप्त झाली. आजच्याच दिवशी भारतात सर्वप्रथम कानपूर आणि लखनौ या दोन शहरांत आजच्या दिवशी 1960 मध्ये STD सेवा सुरु झाली होती.

1994 : भालजी पेंढारकर यांचा मृत्यू (bhalji Pedharkar) 
मराठमोळे दिग्दर्शक भालजी पेंढारकर, ज्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली. चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार अशी त्यांची ओळख. भालजींनी सिनेटोन हा स्टुडिओ खरेदी केला आणि त्याचे नामकरण जयप्रभा स्टुडिओ असे केले. त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली. भारतीय चित्रपटक्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी त्यांना १९९२ साली दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. 

1972 : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal Birthday) याचा जन्म 1972 साली आजच्याच दिवशी झालेला.  अशोक मेहतांची मोक्ष ही त्याची पहिली फिल्म. त्यानं आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

1863 : अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.

1997:  अब्दुल कलाम यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना 'भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर झाला. यानंतर 2002 ते 2007 या काळात ते देशाचे राष्ट्रपती झाले. 

1923: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचा जन्म : बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी अशा चित्रपटांचे दिग्दर्शक राजा ठाकूर यांचा जन्म  आजच्याच दिवशी झाला होता. 

1926 : कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. 

1954 : एल. टी. टी. ई. चा संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन याचा जन्म 

1983: सध्याचं मेटा अर्थात फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.

1985 : 'राजकवी' अशी ओळख असलेले यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत यांचं निधनं... रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना 'महाराष्ट्र कवी' म्हणून गौरविण्यात आले.  

1999 :  पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक दत्तात्रय शंकर जमदग्नी यांचं निधन

2001: चंद्रकांत कृष्णाजी जगताप यांचं निधन. चंद्रकांत जगताप हे प्रसिद्ध शिल्पकार होते. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेत. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत. 

2004:   भारतातील प्रसिद्ध इतिहासकार तपन राय चौधरी यांचे निधन  

2012 : भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. 
 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha at 630AM 13 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 13 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्ससकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hrithik Roshan Luxury House : सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
सी फेसिंग बाल्कनी, रॉयल बेडरुम; हृतिक रोशनच्या 100 कोटींच्या आलिशान घराचे INSIDE PHOTO एकदा पाहाच
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Embed widget