Buldhana Hair Loss : अखेर बुलढण्यातील केस गळतीच्या कारणांचा शोध लागला; धक्कादायक अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती
Buldhana Hair Loss: बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती व टक्कल पडण्याच्या प्रकरणात आता देशाच्या सर्वोच्च असलेल्या आयसीएमआरच्या पथकाने याचा अभ्यास करून केस गळतीच्या कारणाचा शोध लावला आहे.

Buldhana Hair Loss : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 ते 16 गावांमध्ये अचानक नागरिकांना केस गळती व टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता, आणि त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणामुळे स्थानिक आरोग्य प्रशासनापासून तर देशाच्या सर्वोच्च असलेल्या आयसीएमआरच्या पथकाने याचा अभ्यास करून केस गळतीच्या कारणाचा शोध लावला. मात्र या प्रकारचे नेमकं कारण आता पुढे आले असून या परिसरातील केस गळती रुग्णांच्या रक्तात आणि केसांमध्ये 'सेलेनियम' या जड धातूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. परिणामी या प्रकरणाच्या नव्या माहितीमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
सेलेनियम म्हणजे नेमकं काय?
-सेलेनियम हा जड धातू या वर्गात मोडल्या जातो.
-सेलेनियम हे मानवाच्या शरीरात जेवणातून किंवा पाण्यातून प्रवेश करत.
-शरीरात जर सेलेनियम कमी प्रमाणात असेल तर केसांची वाढ झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणात होते. पण सेलेनियम जर शरीरात मोठ्या प्रमाणात वाढलं तर केस गळती होऊन टक्कल पडतो.
-जेवणातील अनेक घटकात सेलेनियमचे प्रमाण असतं, जसं पालक, मांसाहारी पदार्थ, मासे असे पदार्थ जास्त सेवन केल्यास सेलेनियमचे प्रमाण वाढतं.
-मात्र या परिसरात सेलेनियम नागरिकांच्या शरीरात कोणत्या घटकातून जातं हे आता लवकरच कळणार आहे.
अशातच, गेला महिनाभर आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी विविध प्रकारच्या नमुन्यातून अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला असून आज (31 जानेवारी) हा अहवाल केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना सुपूर्त करण्यात येणार आहे, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. लवकरच या अहवालाबाबत प्रशासन माहिती देणार आहे.
केस गळती आणि दृष्टीदोष याचा कुठलाही संबंध नाही.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 15 गावांमध्ये केस गळतीनंतर नागरिकांना डोळ्यासंबंधी तक्रार व दृष्टिहिनता अशा प्रकारच्या तक्रारी प्रसार माध्यमातून समोर आल्याचं आमच्या निदर्शनास आल आहे. मात्र वस्तूस्थिती त्या परिसरात वेगळी आहे. केस गळती आणि दृष्टीदोष याचा कुठलाही संबंध नसल्याचं आमच्या तपासणी नंतर समोर आल आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा आवाहन बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते यांनी शेगाव तालुक्यातील नागरिकांना केल आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
