एक्स्प्लोर

विद्यार्थ्यांची वर्गातील हजेरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, अनेक शाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी

अनेक शाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनं विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं घेणार असल्याचा नवा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या परफॉरमन्स ग्रेड इंडेक्सनुसार शासकीय आणि अनुदानित शाळांना हा नियम असणार आहे.

औरंगाबाद : शाळेत हजेरीला उपस्थित राहण्यासाठी लहानपणी चांगलीच घाई व्हायची. हजर सर, उपस्थित मॅडम अशा मोठ्या आवाजात तुम्ही हजेरी दिली असेल. पण आता हजेरीचा हा प्रकार बंद होण्याची शक्यता आहे. कारण विद्यार्थ्यांची वर्गात घेतली जाणारी हजेरी इतिहासजमा होण्याच्या मार्गाव आहे. अनेक शाळांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनं विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रीक पद्धतीनं घेणार असल्याचा नवा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या परफॉरमन्स ग्रेड इंडेक्सनुसार शासकीय आणि अनुदानित शाळांना हा नियम असणार आहे. आतापर्यंत शाळेत हजेरी घेण्याची पद्धत बदलणार आहे. कारण यापुढं हजेरी नोंदवताना विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगठ्याचा वापर करावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार आता विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीनं घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या हजेरीसाठी खाजगी कंपन्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहेत. त्या कंपन्या या हजेरीवर लक्ष ठेवणार आहेत आणि त्यासाठीच्या प्रक्रियेची पूर्तता देखील करणार आहेत. महत्वाचं म्हणजे यासाठी शासन कुठलीही मदत शाळांना करणार नाही. ही बायोमेट्रिकची सोय शाळांना करावी लागणार असं चित्र आहे. याबाबतचं परिपत्रक आलं आहे. येत्या 1 जानेवारीपासून ते 31 मार्चपर्यंत प्रायोगिक पद्धतीवर हा प्रक्रिया सुरु होईल. सुरुवातीला फक्त मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ही प्रक्रिया होणार आहे. औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांतील काही मोजक्या शाळेत हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. या निर्णयाचे शाळांनी स्वागत केलं आहे. शाळेत हजेरीसाठी जाणारा वेळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देता येईल. त्याचबरोबर या नवी पद्धतीमुळे विद्यार्थी देखील शाळेकडे आकर्षित होतील, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. मुलांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी शासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. अकरावी-बारावीत क्लासेसकडे वाढणारा ओढा आणि ओस पडणाऱ्या महाविद्यालयांसाठी बायोमेट्रिक हजेरीचा उतारा शासनाने ठरवला होता. मात्र हे यशस्वी होऊ शकलं नाही असं काही शिक्षक सांगतात. या पद्धतीनं हजेरी घेतली तर वेळ जाणार हे निश्चित आहे. एका शाळेत हजारांवर मुलं असतात. ही मुलं रांगेत जरी लागली तरी सर्व विद्यार्थ्यांची फक्त हजेरीच घ्यायला चार तास लागतील. शाळा नक्की किती बायोमेट्रिक मशीन बसवणार यावरही मर्यादा असेलच, असे देखील काही शिक्षकांचे मत आहे. मात्र बोगस विद्यार्थी दाखवून हजेरी लावणाऱ्या शाळांसाठी नक्कीच हा धोका असेल. मात्र ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल, त्यांना आता फक्त हजेरीसाठी किमान तास दोन तास राखून ठेवावे लागतील हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत पावसाचा जोर वाढला, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद, तर भिवंडीसह पालघरमध्येही मुसळधार पाऊस
मुंबईत पावसाचा जोर वाढला, अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद, तर भिवंडीसह पालघरमध्येही मुसळधार पाऊस
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 1st T20 : आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही 'नो चान्स'...; वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत एकही सामना खेळणार नाही? जाणून घ्या कारण
आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही 'नो चान्स'...; वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत एकही सामना खेळणार नाही? जाणून घ्या कारण

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
Embed widget