एक्स्प्लोर

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा

Manikrao Kokate : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन प्रचंड गदारोळ झाला.

Manikrao Kokate : 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्या प्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना न्यायालयाने वर्षांचा कारावास आणि 50 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या विरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याचिका दाखल केली होती. तर शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. एकीकडे माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थागितीवर सुनावणी लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे विरोधक माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माणिकराव कोकाटे यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा घेणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.  

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी विधान परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून प्रचंड गदारोळ सुरु झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झाले होते. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिलं. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल, असं वाटलं नव्हतं. विरोधी पक्ष नेत्यांना सांगू इच्छितो की, आपण मंत्रिमहोदयासंदर्भात जे मांडत आहात. त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे. क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेली आहे. कोर्टाची ऑर्डर आल्यावर सभागृह किंवा राज्यपाल निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले. 

नार्वेकरांच्या दालनात बंद दाराआड चर्चा

यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये विधीमंडळातील विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा करण्यात आली. 10 ते 15 मिनिटं चौघांमध्ये बंद दाराआड चर्चा करण्यात आली. या बैठकीतील चर्चा अद्याप समोर आलेली नाही. मात्र,   माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.  

आणखी वाचा 

Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले, 15 मिनिटांत बाहेर पडले, राजीनाम्याचा निर्णय आजच होणार?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर

व्हिडीओ

Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
'कदाचित ही शरद पवारांची राजकीय खेळी वा गरजही असेल, पण समाजविघातक..' बारामतीत अदानींच्या ग्रँड वेलकमनंतर शरद पवार इन्स्पायर फेलोशिपचे मार्गदर्शक पद लेखकांनी सोडलं!
Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
पिंपरी चिंचवड महापालिका : प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांचा 'असा' सामना रंगणार! उमेदवारांची यादी वाचा एका क्लीकवर
Baba Ram Rahim: भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
भर निवडणुकीत पॅरोल दिल्यानंतर बलात्कारी बाबा राम रहिमला नवर्षाचं 'स्पेशल गिफ्ट; पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल मंजूर
Nicolas Maduro: थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
थेट राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून बायकोसह उचलत कैद्यासारखं अमेरिकेत आणलं, उपराष्ट्राध्यक्षांकडे कारभार सोपवला; शस्त्रास्त्र ड्रग्ज तस्करीचा खटला अमेरिकेत चालणार!
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
मोदीजी तुमची 56 इंच छाती आहे तर दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा; ट्रम्पनं करून दाखवलं, तर तुम्हाला का जमत नाही? खासदार ओवेसींनी मुंबईत थेट ललकारलं
Pune Crime News: उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं ते राष्ट्रवादीचा फारुख शेख कोण?
Embed widget