जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात बीडकर रस्त्यावर उतरणार; आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्हाभरातून संताप
Beed News : एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा नाहक बळी दिला जात असल्याच्या भावना व्यक्त केली जात आहे.
Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात होत असलेल्या नोकर भरतीत भ्रष्टाचार (Scam) झाल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कारवाईची घोषणा केली आहे. मात्र, तानाजी सावंत यांच्या या घोषणेबद्दल जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. तर ही निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी करत आज बीडमध्ये ठिकठिकाणी साबळे यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा नाहक बळी दिला जात असल्याच्या भावना व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील लोखंडी सावरगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये झालेल्या आरोग्य भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला. त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई ककरण्याची घोषणा केली. मात्र, या निलंबनाच्या कारवाईला बीडमधील सर्वसामान्य नागरिकांनी विरोध केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यानंतरच डॉक्टर साबळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर, डॉक्टर सुरेश साबळे यांच्या समर्थनार्थ बीडच्या चौका चौकामध्ये बॅनर देखील लावण्यात आले आहेत.
आंदोलनाचा इशारा...
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी बीड शहरात ठिकठिकाणी साबळे यांच्या समर्थनात बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर, बीडच्या जिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयातच निलंबन मागे घेण्यासाठी आंदोलन केलं आहे. तसेच आज सकाळी 11 वाजता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील डॉक्टर सुरेश साबळे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी एक मोठं जनआंदोलन करण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात सुरु असलेल्या नोकरभरतीमध्ये मोठ्याप्रमाणावर पैसे उकळले जात असल्याच्या चर्चा होत्या. यांसंदर्भात विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित करून जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे यांच्या निलंबनाची घोषणा केली आहे. मात्र, तानाजी सावंत यांच्या निर्णयालाच सर्वसामन्यांकडून विरोध होत आहे. तर, एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा नाहक बळी दिला जात असल्याच्या भावना जनतेमधून व्यक्त होत आहे. तसेच या निर्णयाविरोधात विविध संघटना सर्वसामान्य नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
इतर महत्वाचे बातम्या: