Uday Samant On Kaviteche Gav कवीवर्य कुसुमाग्रज यांचे गाव होणार 'कवितेचे गाव'सामंतांची घोषणा
Uday Samant On Kaviteche Gav कवीवर्य कुसुमाग्रज यांचे गाव होणार 'कवितेचे गाव'सामंतांची घोषणा
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव होणार कवितेचे गाव मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे कुसुमाग्रजांच्या शिरवाडे वणी या गावाला भेट देणार भेटी दरम्यान पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर कवितेच्या गावाची औपचारिक घोषणा होणार कवितेच्या दलानाचे उद्घाटन करणार श्रेष्ठ कवींच्या कवितांचे पुस्तके प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होणार काव्य पंक्ती सादर करत उदय सामंत यांनी दिल्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
हे ही वाचा..
पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत. कालपर्यंत पुणे पोलिसांची (Pune Police) आठ पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होती. मात्र, आता या पथकांची संख्या 13 पर्यंत वाढवण्यात आली आहे. दत्तात्रय गाडे लपण्यासाठी कुठे जाऊन शकतो, या सर्व शक्यता विचारात घेऊन पुणे पोलिसांची ही पथकडे चारही बाजूंना रवाना करण्यात आली आहेत. (Pune Rape case)
गुन्हे शाखेने बुधवारी दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. गाडे याच्या एका मैत्रिणीला भोरवरुन चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असा धोशा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावला होता. तो यासाठी मला सतत फोन करुन त्रास द्यायचा, असे या गाडेच्या मैत्रिणीने सांगितले. त्यामुळे दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, यापूर्वीही त्याने महिलांना त्रास दिला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस आता तपास करत आहेत. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या 10 मित्र-मैत्रिणींची चौकशी केली. या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतली आहे. दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरुरचा होता. पोलिसांनी शिरुरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. याशिवाय, दत्तात्रय गाडे याच्या आई-वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलावून घेतले आहे. त्यामुळे आता दत्तात्रय गाडे पोलिसांच्या ताब्यात कधी सापडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.





















