Royal Enfield : बुलेट 350 च्या विक्रीत प्रचंड वाढ; हंटर 350 च्या विक्रीत घट, जाणून घ्या रॉयल एनफील्ड कंपनीचा विक्री अहवाल
Royal Enfield Bullet : रॉयल एनफिल्डने या वर्षी तिची आयकॉनिक बाईक बुलेट 350 अपडेट केली आणि तेव्हापासून तिच्या विक्रीला वेग आला आहे. त्याच वेळी, सर्वात स्वस्त मोटरसायकल हंटर 350 ची विक्री कमी झाली आहे. क्लासिक 350 ही त्याची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे.
Royal Enfield : मोटारसायकल प्रेमींमध्ये चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे - रॉयल एनफिल्ड. या कंपनीच्या बुलेट (Bullet) अनेक प्रकारे खास आहे आणि त्यांची उत्पादनं 300 सीसी पेक्षा जास्त पॉवरफुल बाईक सेगमेंटमध्ये उच्च दर्जाची आहेत. यामुळेच ही स्थानिक कंपनी विक्री चार्टमध्येही चांगली कामगिरी करत आहे. जर आपण गेल्या महिन्याच्या विक्रीचा, म्हणजेच नोव्हेंबर 2023 च्या विक्रीचा चार्ट पाहिला, तर रॉयल एनफिल्डने 30 दिवसांत 75 हजारांहून अधिक बाईक्स विकल्या, ज्यात वार्षिक 14 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
बुलेट 350 च्या विक्रीत प्रचंड वाढ
या वर्षी लाँच केलेल्या नवीन बुलेट 350 च्या विक्रीत वार्षिक 41 टक्के वाढ झाली आहे, तर हंटर 350 च्या विक्रीत घट झाली आहे. 650 ट्विन्सच्या वार्षिक विक्रीत सुमारे 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे, या अहवालावरुन असं दिसतं की, लोक रॉयल एनफिल्डच्या 650 सीसी बाईक्सला चांगलंच पसंत करत आहेत.
गेल्या महिन्यात कशी होती टॉप 3 बाईक्सची विक्री?
रॉयल एनफिल्डची सर्वाधिक विक्री होणारी बाईक क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) यंदा देखील टॉपवर आहे. गेल्या महिन्यात देखील 30 हजार 264 लोकांनी ही बाईक खरेदी केली आहे. क्लासिक 350 ची विक्री 13 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, नोव्हेंबर महिन्यात मासिक विक्रीत 5 टक्क्यांची घट दिसून आली.
गेल्या नोव्हेंबरमध्ये रॉयल एनफिल्डची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी बाईक बुलेट 350 (Royal Enfield Bullet 35) होती, जी 17 हजार 450 लोकांनी खरेदी केली होती. त्यापाठोपाठ हंटर 350 (Royal Enfield Hunter 350) होती, जी 14 हजार 176 ग्राहकांनी विकत घेतली.
इतर रॉयल एनफिल्ड बाईकची विक्री कशी?
Meteor 350 रॉयल एनफिल्डच्या लोकप्रिय बाईक्सच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे, जी गेल्या महिन्यात 8 हजार 51 लोकांनी खरेदी केली होती. या बजेट क्रूझर बाईकच्या विक्रीत मासिक 20 टक्क्यांनी घट झाली आहे. यानंतर 650 ट्विन, म्हणजे कॉन्टिनेंटल जीटी 650 आणि इंटरसेप्टर 650, ज्यांनी गेल्या महिन्यात 2 हजार 112 युनिट्सची विक्री केली. या दोन शक्तिशाली बाईक्सच्या विक्रीत वार्षिक सुमारे 66 टक्के आणि मासिक 21 टक्के वाढ झाली आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये हिमालयन सीरिजच्या बाईक 1 हजार 814 लोकांनी खरेदी केल्या होत्या, ज्या यंदा मासिक आणि वार्षिक घट दर्शवतात. रॉयल एनफिल्डची सर्वात कमी विक्री होणारी मोटारसायकल Super Meteor 650 आहे, जी 1 हजार 270 लोकांनी विकत घेतली आणि ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत तिची विक्री 42 टक्क्यांनी कमी झाली आहे.
हेही वाचा: