एक्स्प्लोर

IPL 2025: Gujarat Titans vs Mumbai Indians: चल नीघ आता...हार्दिक पांड्या-साई किशोर यांच्यात राडा; अंपायरही धावले, मैदानात काय घडलं?, VIDEO

IPL 2025: Gujarat Titans vs Mumbai Indians: मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. 

IPL 2025: Gujarat Titans vs Mumbai Indians: गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ( Gujarat Titans vs Mumbai Indians) 36 धावांनी पराभव केला आहे. आयपीएल 2025 मध्ये गुजरातचा हा पहिला विजय ठरला आहे. तर मुंबईच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या. प्रत्युत्तरात, संपूर्ण मुंबई संघ फक्त 160 धावा करू शकला. रोहित शर्मा (Rohit Sharma) सलग दुसऱ्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, तर हार्दिक पांड्यालाही (Hardik Pandya) मोठी खेळी खेळता आली नाही. दरम्यान मुंबई आणि गुजरातच्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात राडा झाल्याचं पाहायला मिळालं. 

हार्दिक पांड्या आणि साई किशोर यांच्यात वाद-

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यादरम्यान आर. साई किशोर आणि हार्दिक पांड्या यांच्यात वाद झाला. हार्दिक पांड्या फलंदाजी करत असताना साई किशोर गोलंदाजीसाठी आला. यावेळी साई किशोरने हार्दिक पांड्याला एक चांगला चेंडू टाकला. हा चेंडू सहजरित्या हार्दिक पांड्याने खेळला आणि चेंडू गोलंदाजी करत असलेल्या साई किशोरकडे गेला. यानंतर साई किशोर हार्दिक पांड्याकडे पाहत राहिला. हार्दिक पांड्यानेही त्याला रागात पाहिले आणि चल नीघ...असं म्हणाला. यावेळी अंपायरही मध्यस्थीला धावल्याचे पाहायला मिळाले. 

आयपीएल 2025 मधील पहिला राडा-

क्रिकेटमध्ये खेळाडूंमधील अशा प्रकारच्या संघर्ष सामान्य आहेत. तथापि, आयपीएल 2025 मध्ये अद्याप असे काहीही दिसलेले नाही. आयपीएलच्या गेल्या हंगामात, केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणावर अशाच एका वादामुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. तथापि, हार्दिक पंड्या आणि साई किशोर यांच्या बाबतीत अद्याप असे काहीही घडलेले नाही. 

शुभमन गिल आणि साई सुदर्शनचा तडाखा!

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी सुरुवातीलाच एमआयचा निर्णय चुकीचा सिद्ध केला, कारण गुजरातने पॉवरप्लेमध्येच एकही विकेट न गमावता 66 धावा केल्या. हार्दिक पांड्याने गिलला बाद केले, जो 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिल व्यतिरिक्त जोस बटलरनेही 24 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. 17 षटकांत गुजरात टायटन्सचा स्कोअर 3 गडी गमावून 170 धावा असा होता. पण त्यानंतर, गुजरातच्या फलंदाजांना 3 षटकांत फक्त 26 धावा करता आल्या आणि एकूण 5 विकेट गमावल्या. ज्यामुळे गुजरातला 200 पेक्षा कमी धावसंख्येवर रोखले. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 196 धावा केल्या आहेत. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी 1  विकेट घेतली.

संबंधित बातमी:

GT vs MI IPL 2025 : 'मुंबई'वर गुजरातच भारी! हार्दिक पांड्याच्या टीमचा 'लाजेलाही लाजवणारा' लाजिरवाणा पराभव

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana News : टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
टी-20 वर्ल्डकपनंतर हर्षित राणा आता IPL मधून OUT...; नेमकं काय घडलं?, KKR चे गणित बिघडले
Blessing Muzarabani News : आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या
RCB IPL 2026 Team Playing XI: धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
धडकी भरवणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा , बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
Embed widget