Pune Mahesh Motewar News | जामिनावर बाहेर आललेल्या महेश मोतेवारची पुन्हा पैसै गोळा करण्यास सुरुवात
Pune Mahesh Motewar News | जामिनावर बाहेर आललेल्या महेश मोतेवारची पुन्हा पैसै गोळा करण्यास सुरुवात
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना फोनवरून धमकावल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकरची रोल्स रॉईस चर्चेत आली होती... आता याचा धागा पकडत माहिती घेत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही रोल्स रॉईस अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोतेवारची असल्याचं म्हटलं जातंय. आता तोच समृद्धी जीवनद्वारे फसवणूक करणारा आणि जामिनावर बाहेर आलेला मोतेवार पुन्हा पैसे जमा करत असल्याचं उघड झालंय. जादा परताव्याचं आमीष दाखवत मोतेवार पैसे जमा करतोय. त्यासाठी मोतेवार ऑनलाईन बैठका घेत आहे. ते व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागलेत. जुने साथीदार भुजंग देशमुख आणि संदीप पाटील यांच्या नावे दौलत प्राईड नावाने कंपनी स्थापन केलीय. आधीच्या समृद्ध जीवन कंपनीत लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेत. त्यांना परतावाही मिळालेला नाही. ते पैसे परत मिळण्यासाठी त्या गुंतवणूकदारांना आता दौलत प्राईडमध्ये गुंतवणूक करायला सांगितली जातेय. त्य़ासाठी ११०० रूपये आकारले जातायत. मोतेवारच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून ठेवीदारांची देणी देणं अपेक्षित होतं. मात्र ज्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी होती त्यांनीच मोतेवारच्या मालमत्ता हडप केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय. कोरटकरकडची रोल्स रॉईसही अशाच प्रकारे हडप केल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. गुंतवणूकदारांनी ११ मार्चला धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.























