औरंगजेबाची कबर हटवा, ती राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही, हायकोर्टात याचिका दाखल
औरंगजेबाची कबर ( Aurangzeb tomb) हटवण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर (Ketan Tirodkar) यांनी याचिका दाखल केली आहे.

मुंबई : औरंगजेबाची कबर ( Aurangzeb tomb) हटवण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर (Ketan Tirodkar) यांनी याचिका दाखल केली आहे. औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या (national monuments) व्याख्येत बसत नाही, त्यातून पुढच्या पिढीला वारसा किंवा शिकवण घेण्यासारखं काहीही नाही असं केतन तिरोडकर यांनी याचिकेत म्हटलं आहे. त्यामुळे केंद्रिय पुरातत्व विभागाला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून औरंगजेबाची कबर हटवण्याचे निर्देश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
सरकारनं औरंगजेबाची कबर कायमची हटवून टाकावी
कबर पुरातत्व विभागाच्या यादीतून वगळली की राज्य सरकारनं ती तिथून कायमची हटवून टाकावी, जेणेकरून भविष्यात पुन्हा यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही असे मत केतन तिरोडकर यांनी व्यक्त केलं आहे. याशिवाय छावा सिनेमाच्या प्रदर्शनावर तूर्तास बंदी घालण्याबाबतही राज्य सरकारनं विचार करण्याची विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. या प्रकरणानंतर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे.
औरंगजेबच्या कबरीवरून राज्यातील वातावरण गरम
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबच्या कबरीवरून (Aurangzeb Tomb) राज्यात वाद सुरू आहे. राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून खुलताबादेतील (Khultabad) कबर हटवण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. नागपुरात औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे दंगल झाली आहे. मराठवाड्यातही (Marathwada) तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसंच 17 मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. त्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. नागपूरसह मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहे. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या:
Imtiaz Jaleel Majha Vision : औरंगजेबला तुम्ही जिवंत केलं, अबू आझमीच्या मतदारसंघातील ड्रग्जच्या धंद्यावर का बोलत नाही? भाजपनेच वादग्रस्त बोलण्यास भाग पाडलं; इम्तियाज जलीलांकडून प्रश्नांची सरबत्ती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

