Work From Home साठी काही फायद्याचे सल्ले; आहाराच्या 'या' सवयी ठरतील उपयुक्त
आहाराच्या योग्य सवयी अवलंबणं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी खात आहात, त्याचा शरीराला कितपत फायदा होत आहे याबाबत किमान माहिती ठेवण

Work From Home कोरोना विषाणूनं साऱ्या जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली आणि त्याचे थेट परिणाम हे जीवशैलीवर झाले. सर्वच सवयी पुरत्या बदलल्या आणि अनेकांना या बदललेल्या जीवनशैलीमध्ये समतोल राखण्यात बराच वेळही दवडावा लागला. अगदी काम करण्याच्या सवयींपासून एखादी गोष्ट आणण्यासाठी बाहेर जाण्याच्या सवयींमध्ये काही नवे नियम जोडले गेले. दैनंदिन आयुष्यात कार्यालयात जाऊन काम करण्यावरही निर्बंध आले आणि सुरुवात झाली Work From Home ची.
गेल्या कित्येत महिन्यांपासून Work From Home सुरु आहे, पण यातच अनेकांना अस्वस्थताही येऊ लागली आहे. Work From Home आता आपल्या जीवनशैलीचाच एक भाग असून, त्याचा सकारात्मकपणे स्वीकार करत आरोग्याचीही कशी काळजी घेता येईल यासाठीच्या काही खास टीप्स, खालीलप्रमाणे...
स्वयंपाकघरानजीक काम करु नका- तुमचं वर्कस्टेशन म्हणजेच काम करण्याचं ठिकाण घरात स्वयंपाकघरापासून दूर असावं. ज्यामुळं तुमचं लक्ष विचलित होण्याची संधी तशी कमीच मिळेल.
आहाराच्या वेळा ठरवा- ज्या प्रकारे तुम्ही झोपण्याची, व्यायामाची, कामाची वेळ ठरवता त्याचप्रमाणं आहाराचीही वेळ निर्धारित करा. नोकरीच्या ठिकाणी वेळच्या वेळी तुम्ही जसं काहीतरी खात असता तिच सवय घरीही ठेवा.
खाणं टाळू नका- अनेकदा कामाच्या व्यापात बराच वेळ जातो आणि पुढ्यात असणारं खाणंही आपण विसरुन जातो. पण, ही सवय मुळीच चांगली नाही. भूक लागेल तेव्हा खाणं कधीही उत्तम. गरज असल्यास मोबाईल टाईमरचा वापर करत खाण्याची वेळ आणि सवय अंगी बाणवा.
संतुलित आहाराला प्राधान्य द्या- घरच्या घरी असल्यामुळं खाण्याच्या सवयींवरही ताबा ठेवा. खाण्यामध्ये सर्वच पोषक द्रव्यांचा समतोल कसा राखला जाईल यावर भर द्या. संतुलित आहाराचा फायदा शरीराला होतो आणि सोबतच मनावरही त्याचे परिणाम दिसून येतात.
भरपूर पाणी प्या- पाणी प्यायल्यामुळं शरीराचा थकवा दूर होतो आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवत नाही. ज्याप्रमाणं ऑफिसमध्ये टेबलवर पाण्याची बाटली ठेवता त्याचप्रमाणं घरीही काम करताना बाजूला पाण्याची बाटली भरुन ठेवा.
कॅफिनचं सेवन कमी करा- चहा- कॉफी घेत काम करण्याला अनेकांची पसंती असते. पण, याचं प्रमाणाबाहेर सेवन धोक्याचं आहे. यामुळं डोकेदुखी, पचनास त्रास आणि अस्वस्थताही वाढते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
