Dada Bhuse : विद्यार्थ्यांना आहारात अंडी देण्याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, पालकांच्या तक्रारी...
Dada Bhuse : मध्यान्ह भोजनात पुन्हा अंडी सुरु करण्याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठे संकेत दिले आहे.

Dada Bhuse : राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. या मध्यान्ह भोजनात पोषक तत्त्वांचा समावेश असावा, असा नियम असून गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहेत. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून निषेध व्यक्त केला होता. यानंतर हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. आता मध्यान्ह भोजनात पुन्हा अंडी सुरु करण्याबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोठे संकेत दिले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अंडी हवी त्यांना उपलब्ध करून देवू, असे त्यांनी म्हटले आहे.
अंड्यामधून प्रोटीन्स मिळतात, मागील काळात अंडे निष्कृष्ट असल्याच्या पालकांच्या तक्रारी होत्या त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहारातून अंडी देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. मात्र पुन्हा आता पालकांमधून अंडी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ज्या विद्यार्थी पालकांना अंडी देण्याची आवश्यकता आहे. त्यांना अंड्यांची उपलब्धता शिक्षण विभाकडून करून देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले दादा भुसे?
दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अमित शाह यांच्या कोर्टात गेला आहे. अमित शाह शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात पुण्यात विशेष बैठक झालेली आहे. त्यात पालकमंत्री पदावर चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनी पालकमंत्री पदाचा निर्णय दोन दिवसांत मार्गी लागेल, असे म्हटले आहे. याबाबत दादा भुसे यांना विचारले असता नाशिकच्या पालकमंत्रीबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आहेत. त्यांना जो निर्णय वाटले ते घेतील. त्याबाबत फारसी उत्सुकता ठेवू नका, असे त्यांनी म्हटले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Dada Bhuse : तू असाच जळत राहा, संजय राऊतांच्या टीकेवर दादा भुसेंचे एका वाक्यात उत्तर























