एक्स्प्लोर

Mangala Gauri 2022 : मंगळागौरी पूजन का करतात? जाणून घ्या आख्यायिका

Mangala Gauri 2022 : श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने जाणून घ्या मंगळागौरीची कथा.

Mangala Gauri 2022 : श्रावण (Shravan 2022) महिना हा विविध सण, उत्सवांचा सण. याच महिन्यात येणारा उत्सव म्हणजेच मंगळागौर. श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते. याच मंगळागौरी मागची कथा ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी सांगितली आहे ती जाणून घेऊयात. 

मंगळागौरीची कथा : 

मंगळागौरीची कथा ही कथा साधारण सत्यनारायण कथेप्रमाणेच आहे. साधूवाण्याप्रमाणे इथेही एक धनपाल वाणी आहे हे विशेष! त्या कथेचा सारांश असा की धनपाल वाण्याला मूल नव्हते. त्याच्या दारात रोज एक गोसावी भिक्षा मागण्यासाठी येई. पण अपत्यहीन वाण्याकडची भिक्षा नाकारून तसाच परत जाई. एकदा वाण्याच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने लपून बसून अचानक पुढे होऊन त्या गोसाव्याला भिक्षा वाढली. त्यामुळे गोसावी रागावला. परंतु वाण्याच्या बायकोने क्षमायाचना केल्यावर त्याने दया येऊन एक उपाय सुचविला. त्यानुसार निळ्या घोडीवर निळा पोशाख करून वाणी वनातून जात असताना जिथे घोडा अडला तिथे खणल्यावर त्याला पार्वतीचे देऊळ लागले. पार्वतीमातेला त्याने आपली व्यथा सांगितली. पार्वतीमातेने त्याला दीर्घायुषी आंधळा अथवा गुणी पण अल्पायुषी ह्या दोघापैकी कसा मुलगा हवा ते विचारले. त्यावेळी वाण्याने गुणी परंतु अल्पायुषी मुलगा चालेल असे सागितले. मग देवीने त्याला देवळाच्या पाठच्या आंब्याच्या झाडावरून एक आंबा तोडून तो पत्नीला खावयास देण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या वाण्याने एक आंबा पत्नीला नेऊन दिला. तिने तो खाल्ला.

पुढे देवीच्या कृपेने तिला मुलगा झाला. त्यांनी त्या मुलाचे नाव ‘शिव’ ठेवले. यथाकाल त्याची मुंज केली. तो दहा वर्षांचा असतानाच त्याला मुली सांगून येऊ लागल्या. तो ससेमिरा चुकविण्यासाठी मग वाण्याने मामासह शिवाला काशीयात्रेला पाठविले. वाटेत एका नगरातील बागेजवळून जाताना लहान मुलींचे भांडण होत होते. ते मामांनी ऐकले. त्यातील एका मुलीने सुशीला नावाच्या दुसऱ्या मुलीला काही अपशब्द ऐकविला. त्यावेळी ती मुलगी म्हणाली, ‘माझ्या आईने गौरीव्रत केल्यामुळे मी कधीच विधवा होणार नाही. ‘ ते ऐकून शिवाच्या मामाने ह्या मुलीशी शिवाचे लग्न करून द्यायचे असे मनाशी ठरविले. पुढे यथाकाल विविध अडचणींचा परिहार होत होत त्यांचा विवाह, वियोग आणि पुनर्मिलन होते.

काहीशी सत्यनारायण आणि वटपौर्णिमेच्या कथानकाशी मिळतीजुळती ही कथा मंगलागौरीच्या पूजेच्या पुस्तिकेत सविस्तरपणे दिलेली असते. तिचे वाचन झाल्यावर सर्व स्त्रियांनी हातातील तांदूळ गौरीला वाहून तिला नमस्कार करावा. नंतर मौन धारण करून जेवावे. रात्रौ उपवासाचे, फराळाचे पदार्थ खाऊन विविध गाणी आणि खेळ खेळावेत. एकमेकींना हळदकुंकू द्यावे-ध्यावे. पाच अथवा सात वर्षांनी उद्यापन करावे ह्या सर्व पूजेमध्ये चण्याच्या डाळीचे, धण्याचे, जिऱ्याचे आणि तांदळाचे प्रत्येकी सोळा दाणे देवीला वाहिले जातात तसेच सोळा पत्रींबरोबर बेलाची पाच पाने वाहिली जातात. दुसऱ्या दिवशी अग्निस्थापना केल्यानंतर तीळ, खीर आणि तूप ह्यांचा होम करावा. सुपामध्ये साडीचोळी, गोड पदार्थ आणि फळे घालून ते वायन मुलीने आईला, आई नसल्यास माहेरच्या दुसऱ्या सवाष्णीला द्यावे. त्यानंतर गौरीचे विसर्जन करावे.

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आई-बाळाच्या जीवाशी खेळ नको! गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे, डॉक्टर सांगतात...
आई-बाळाच्या जीवाशी खेळ नको! गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे, डॉक्टर सांगतात...
Health News: भारतात वाढतंय TBचं संकट; किती आठवडे खोकला राहिल्याने त्रास वाढतो? लक्षणे कोणती?
भारतात वाढतंय TBचं संकट; किती आठवडे खोकला राहिल्याने त्रास वाढतो? लक्षणे कोणती?
Women Health: गर्भावस्थेतच क्षयरोगाचा धोका? आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा, 'ही' लक्षणं वेळीच ओळखा..
गर्भावस्थेतच क्षयरोगाचा धोका? आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा, 'ही' लक्षणं वेळीच ओळखा..
Swami Samarth Prakat Din 2026: प्रचंड स्वामीबळ पाठीशी! स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा, स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा...
प्रचंड स्वामीबळ पाठीशी! स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा, स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा...

व्हिडीओ

Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही
Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!
मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी
नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन
नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन
जन्मदात्या बापाचा सैतानी अवतार! शेजारच्या घरात चोरीच्या संशयावरून दोन लेकींना रात्रभर उलटं टांगलं; 10 वर्षीय चिमुरडीचा पाणी पाणी करत तडफडून जीव गेला, नातीसाठी धावलेल्या आजोबावर कोयत्याने हल्ला
जन्मदात्या बापाचा सैतानी अवतार! शेजारच्या घरात चोरीच्या संशयावरून दोन लेकींना रात्रभर उलटं टांगलं; 10 वर्षीय चिमुरडीचा पाणी पाणी करत तडफडून जीव गेला, नातीसाठी धावलेल्या आजोबावर कोयत्याने हल्ला
Vasai Bhondubaba: मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती सांगत पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं; वसईच्या भोंदूबाबाला शोधण्यासाठी 4 पथकं मैदानात
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Video: IPS Couple चा रोमँटिक अंदाज! एसपी आणि एएसपीच्या साखरपुड्यातील 3 डान्स व्हिडिओंनी सर्वांचं लक्ष वेधलं
Hardik Pandya:हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिंकलं, ग्राऊंड्समनला 10-10 लाखांचे चेक वाटले, वर्ल्डकप दरम्यान दिलेला शब्द पाळला
हार्दिक पांड्याच्या दिलदार कृतीनं पुन्हा एकदा मन जिंकलं, ग्राऊंड्समनला 10-10 लाखांचे चेक वाटले, वर्ल्डकप दरम्यान दिलेला शब्द पाळला
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Embed widget