एक्स्प्लोर

Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ

Karjat Jamkhed Vidhan Sabha Constituency : माझी राज्यातील ओळख ही पवार साहेबांमुळेच आहे. ईडी, सीबीआयचे संकट माझ्यावर आले. पण, मी घाबरलो नाही, असेही रोहित पवार यांनी म्हटले.

कर्जत : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर सभा घेतली. या सभेतून रोहित पवार यांनी शरद पवारांचा  'राजकारणातील वस्तादांचा वस्ताद', असा उल्लेख केला. तसेच त्यांच्या विरोधातील उमेदवार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर देखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. 

रोहित पवार म्हणाले की, सभेसाठी 30 हजार खुर्च्या ठेवल्या होत्या, त्या कमी पडल्या. शेजारी भाजपची सभा सुरू आहे. तिथल्या मोकळ्या खुर्च्या आपण आणल्या आणि इकडे लावून टाकल्या, असे म्हणत त्यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या सभेवर टीका केली. पवार साहेब सभेला आल्याने मी भावनिक झालोय. येणाऱ्या 20 तारखेला एक लाखांची लीड कशी मिळेल, यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. 

लाडकी खुर्ची जपण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडला

माझी राज्यातील ओळख ही पवार साहेबांमुळेच आहे. ईडी, सीबीआयचे संकट माझ्यावर आले. पण, मी घाबरलो नाही. कर्जत-जामखेडच्या लोकांनी मला लढायला शिकवले आहे. माझे कुटुंब म्हणजे माझी कर्जत-जामखेडची जनता आहे, असे म्हणत भाषण सुरू असताना रोहित पवारांनी स्टेजवर नतमस्तक होत जनतेला अभिवादन केले. लाडकी खुर्ची जपण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडला. 

रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल 

अडचणीच्या काळात जी माणसं आपल्यासोबत असतात, तीच माणसं आपली असतात. 25 वर्ष ज्या बस डेपोसाठी जनता वाट पाहत होती, तो सहा महिन्यात आपण मंजूर करून आणला. 12 खात्याचे मंत्री राहिलेल्या व्यक्तीला ते करता आलं नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर टीका केली. 38 हजार महिलांपर्यंत माझी आई पोहचली. बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी 33 कोटी रुपयांची मदत महिलांना दिली. माझ्या वडिलांचा शेती क्षेत्रातला अभ्यास आहे, ते माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना शेती मार्गदर्शन करतात. काही दिवसांपूर्वी माझ्यावर राम शिंदे यांच्याकडून खालच्या पातळीवर बोललं गेलं. महिलांबद्दल अश्लील भाषेत हातवारे केले गेले. माझ्या आईने मला सांगितले की, विरोधक काहीही बोलले तरी तु तुझ्या भाषणात महिलांचा आदरच केला पाहिजे, असे म्हणत त्यांनी राम शिंदेंना टोला लगावला. 200 लोकांकडून टाळ्या मिळवण्यासाठी भाषणात काहीही बोलणं योग्य नाही. शेवटी कामं करावी लागतात, पण कोरोना काळात तुम्ही घरातील बागेला पाणी घालत बसला होतात. जेव्हा लोकांना, जनावरांना पाणी मिळत नव्हतं, तेव्हा तुम्ही घरात बसला होतात, असा घणाघात देखील रोहित पवारांनी राम शिंदेंवर केला.

आणखी वाचा 

Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 13 March 2025JOB Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?Maharashtra Superfast | राज्यातील बातम्यांचा आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha | 13 March 2025 7 PmSatish Bhosale Khokya News | सहा दिवस खोक्या होता कुठे? खोक्याला बेड्या कश्या ठोकल्या? ते खोक्याच्या घरावरील कारवाई; संपूर्ण व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
खोक्या उर्फ सतीश भोसलेला महाराष्ट्रात आणण्याचा मार्ग मोकळा, बीड पोलिसांना मिळाला ट्रांझीट रिमांड
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात श्रीकृष्णासाठी मुस्लिम विणकरांनी बनवलेल्या कपड्यांवर बंदी घालण्यास नकार; धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना मंदिर प्रशासनाची चपराक
Embed widget