Health: सरकारी कार्यालयात गुटखा, तंबाखू खाणाऱ्यांनो सावधान! कर्मचाऱ्यांना बसणार दणका; 'या' राज्य सरकारचा आदेश, अंमलबजावणी होणार
Health: सरकारी कार्यालयात सिगारेट ओढणे, गुटखा खाणे किंवा तंबाखूजन्य पदार्थ वापरणे यावर 'या' राज्याकडून बंदी. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार.
Health: सरकारी कार्यालयात सिगारेट ओढणे, गुटखा खाणे किंवा तंबाखूजन्य पदार्थ वापरणे यावर बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा आदेश जारी केला आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये फलक लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कोणी तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या संदर्भातील एक पत्रकही कर्नाटक सरकारकडून जारी करण्यात आले आहे.
शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा
सरकारी कार्यालयांमध्ये सिगारेट कर्नाटक सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना सरकारी कार्यालये आणि परिसरात सिगारेट ओढण्यास, तसेच कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास बंदी घातली आहे. कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाने (डीपीएआर) जारी केलेल्या आदेशात असे स्पष्टपणे लिहिले आहे की, उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारी कार्यालयात सिगारेट ओढणारे अडचणीत
सरकारी कार्यालये आणि परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जात असल्याचं सरकारच्या निदर्शनास आल्याचं या आदेशात म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हितासाठी तसेच सार्वजनिक आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे धूम्रपानापासून संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्यामुळे शासकीय कार्यालये आणि कार्यालयाच्या परिसरात कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याकडून धूम्रपानासह तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
कडक कारवाई होणार
या सूचनांचे उल्लंघन करून जो कोणी सरकारी कर्मचारी कार्यालयात किंवा कार्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ (गुटखा, पान मसाला इ.) धूम्रपान करताना किंवा सेवन करताना आढळून आल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
काय म्हटलंय पत्रकात?
पत्रकात असेही लिहिले आहे की, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा 2003 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अशा उत्पादनांचे सेवन पूर्णपणे प्रतिबंधित आहे. कर्नाटक राज्य नागरी सेवा नियम, 2021 च्या नियम-31 मध्ये सार्वजनिक ठिकाणी कोणतेही मादक पेय किंवा मादक पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे.
हेही वाचा>>>
Women Health: काय सांगता! उशीरा गर्भधारणेमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका? सुरुवातीची लक्षणे कोणती? कसा वाढतो धोका? तज्ज्ञ काय म्हणतात?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )