एक्स्प्लोर

Health : चमचा-काट्याने खाणं विसरा...तुमचाच हात जगन्नाथ! लठ्ठपणा राहील दूर, आयुर्वेदात सांगितलंय 'हे' महत्त्व

Health : आयुर्वेदानुसार हाताने खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात याशिवाय जेव्हा आपण आपल्या हातांनी अन्नाला स्पर्श करतो तेव्हा मेंदूला एक सिग्नल पाठवला जातो की...

Health : बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या सवयीही बदलल्या आहेत. अनेक जण पाश्चात्य संस्कृतीचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करतात. काही जण अन्न खाताना चमचे आणि काट्याचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुमचाच हात तुमच्या आरोग्यासाठी खरा जगन्नाथ आहे. कारण आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहे.  हाताने अन्न खाल्ल्याने वजन आणि लठ्ठपणाही नियंत्रणात ठेवता येतो. यासंदर्भात आयुर्वेदात काय म्हटलंय? जाणून घ्या...

आयुर्वेदानाही 'हे' मान्य केलंय की...

प्राचीन काळी लोक हाताने अन्न खात असत. हाताने अन्न खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.  हाताने जेवणे ही केवळ एक परंपरा नाही तर या परंपरेमुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. आयुर्वेदानेही हे मान्य केले आहे की आयुर्वेदानुसार हाताने खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो. याशिवाय हाताने अन्न खाल्ल्याने वजन आणि लठ्ठपणाही नियंत्रणात ठेवता येतो.. गरज आणि वातावरणाचा विचार करून लोकांनी आता चमच्याने जेवायला सुरुवात केली असली तरी जेव्हा जेव्हा हाताने खाण्याची संधी मिळेल तेव्हा ही संधी सोडता कामा नये. आयुर्वेद आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवण्याचे काम करतो. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी हाताने खाण्याचे फायदे आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या अनेकदा आरोग्याशी संबंधित अशा टिप्स शेअर करतात आणि लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्याचे काम करतात. चला जाणून घेऊया या फायद्यांबद्दल...

View this post on Instagram
 
A post shared by Dr Dixa Bhavsar Savaliya (@drdixa_healingsouls)

आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाल्ल्याने नेमके काय होते?

आयुर्वेदानुसार हाताने अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

आयुर्वेदानुसार, हाताची पाच बोटे आकाश (अंगठा), वायु (तर्जनी), अग्नि (मधली बोट), पाणी (अनाठी), पृथ्वी (करंगळी) दर्शवतात. हाताने खाल्ल्याने शरीरातील या पाच घटकांचे संतुलन राखून शरीराला ऊर्जाही मिळते.

याशिवाय जेव्हा आपण आपल्या हातांनी अन्नाला स्पर्श करतो तेव्हा मेंदूला एक सिग्नल पाठवला जातो की आपण खाण्यासाठी तयार आहोत, ज्यामुळे मेंदू आवश्यक पाचक एन्झाइम्स सोडतो, जे अन्न सहज पचण्यास मदत करते.

हाताने जेवताना आपण किती खावे, काय खावे आणि कोणत्या वेगाने खावे हे समजू शकतो, ज्यामुळे पचनाचे काम सोपे होण्यास मदत होते.

पचनसंस्था निरोगी ठेवायची असेल, तर चमचा सोडून हाताने खाण्याची सवय लावा, पण हाताने खाताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्या. जेवण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने धुवावे लागतात.

हेही वाचा>>>

World Digestive Health Day 2024: पचनक्रियेचे 'हे' 5 कर्करोग ठरतील प्राणघातक! निरोगी जीवनाचं रहस्य जाणून घ्यायचंय? तज्ज्ञ सांगतात...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinet Expansion : येत्या 15 तारखेला नागपूरमध्ये होणार मंत्रिमंडळाचा विस्तार : सूत्रMaharashtra Ration Supply : राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्पAllu Arjun get 14 Days Judicial Custody : अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Headlines : 04 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
Uddhav Thackeray : ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
ठाकरेंकडून हिंदुत्वाचा मुद्दा दाखवण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नेत्याचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी ज्यांना लाथ मारली...
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
इलेक्ट्रीक पोलला धडकली बस, 28 प्रवासी जखमी; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
Virat Kohli : तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
तिसऱ्या कसोटीत किंग कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'विराट' पराक्रम करणार! असा पराक्रम करणारा सचिननंतर दुसराच खेळाडू
Navneet Rana : जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
जनाब उद्धव ठाकरे, मोदीजींवर बोलायची तुमची लायकी नाही; नवनीत राणांचा घणाघात
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल
Priyanka Gandhi : नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रद्रावतार!
नेहरूंनी काय केले? अहो, वर्तमानाबद्दल बोला, सर्व जबाबदारी नेहरूजींची आहे का? प्रियांका गांधींचा पहिल्याच भाषणात रुद्रावतार!
Embed widget