Maharashtra Ration Supply : राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प
राज्यभरात स्वस्त धान्य दुकानांमधला रेशन पुरवठा ठप्प...लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्याने धान्य वाटपाला फटका...आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणार...
राज्यभरातील रेशन वाटप सध्या ठप्प झाले आहे, पुढील दोन दिवस रेशनिंग दुकानावर धान्य वाटप होणार नाहीये, लाभार्थ्यांची माहिती इंटरनेटवर अपडेट करत असल्याने धान्य वाटप होणार नाहीये, राज्यभरातील लाभार्थ्यांची माहिती सेव्ह केली जाते, त्या क्लाऊडची मुदत संपल्यानं सर्व डेटा दुसरीकडे शिफ्ट करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे आणखी दोन दिवसांनी रेशनिंग वाटप सुरळीत होईल, राज्यात अंदाजे ७ कोटी लाभार्थी असून या महिन्यातील आतापर्यंत ५ टक्के रेशन वाटप करण्यात आलं आहे.
लाखो गरजुंना ज्या ई-पॉस मशिनच्या माध्यमातून धान्य मिळतं... ती ई पॉस मशिन नेमकी काय आहे? कशी काम करते? तिचं महत्त्व काय? हे पाहूया...




















