एक्स्प्लोर

... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णालयातील व्हिडिओ व्हायरल

परभणीतील संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना करणाऱ्या आरोपाला आंदोलकांनी चांगलाच चोप दिला होता

परभणी : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून परभणीतील घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, संविधानप्रेमी व भीमसैनिकांनी निषेध मोर्चा काढून परभणीतील (Parbhani) घटनेवर आपला निषेध नोंदवला.  संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतीची विटंबना करण्यात आल्याने परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एका व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना केल्याने परभणी जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. येथील आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. त्यामुळे, पोलिसांनी (Police) संबंधित आरोपाला ताब्यातही घेतली होते. अखेर भीमसैनिकांनी सुनावल्यानंतर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेपुढे झाला नतमस्तक झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियातून तुफान व्हायरल होत आहे. 

परभणीतील संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची विटंबना करणाऱ्या आरोपाला आंदोलकांनी चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर, त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, अखेर जिल्हा रुग्णालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन घडल्या प्रकाराबाबत आरोपीने माफी मागितीली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतीची 10 डिसेंबर रोजी एका माथेफिरूने विटंबना केली होती. त्यानंतर त्या माथेफिरूला आंबेडकर अनुयायांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते. सध्या तो आरोपी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. उपचारादरम्यान परभणी शहरातील काही आंबेडकर अनुयायांनी दवाखान्यात जाऊन त्याच्याशी बातचीत केली. त्यानंतर तो माथेफिरू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भीमसैनिकांकडून आरोपीला समजावून सांगण्यात येत असल्याचे दिसते. त्यानंतर, दोन्ही हात जोडून रुग्णालयातच तो डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होताना दिसून येतो. 

दरम्यान, परभणीतील आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील तीन पोलीस ठाण्यांतर्गत 300 ते 350 जणांवर विविध कलमान्वयने एकुण 8 गुन्हे दाखल केले आहेत. ज्यात 50 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 41 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. शिवाय या घटनांचे व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेज चेक करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचेही नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक शहाजी उमप यांनी सांगितलं. मात्र, या हिंसाचारात सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे, ज्यांचीही काहीही चूक नाही, त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसल्याने अनेकांनी अश्रू ढाळले. 

हेही वाचा

Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंतPrashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget