एक्स्प्लोर
धडधाडकट माणसाला 'गजनी' बनवू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता; वेळीच सावध व्हा, नाहीतर हळूहळू सगळंच विसराल!
Vitamin B12 Deficiency: तुम्ही तुमच्या दररोजच्या लहानसहान गोष्टी विसरताय का? एखाद्या वेळी झालं तर ठिक आहे, पण तुमच्यासोबत हे सातत्यानं होत असेल, तर वेळीच सावध व्हा नाहीतर, तुम्ही हळूहळू सगळंच विसराल.

Vitamin B12 Deficiency
1/8

व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12) आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे, काहीवेळा या जीवनसत्वाची कमतरता बॅड बॅक्टेरिया, अँटीबायोटिक्सचा अति प्रमाणात सेवन किंवा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळेही होऊ शकते.
2/8

ज्याप्रमाणे शरीराला सशक्त आणि निरोगी बनवण्यासाठी व्हिटॅमिन ए, बी, सी आणि डी आवश्यक असतं, त्याचप्रमाणे एक व्हिटॅमिन आहे, ज्याचं सेवन केल्यावर आपली स्मरणशक्ती वाढते (Memory Power) आणि जर आपण हे जीवनसत्व रोज घेतलं, तर अल्झायमर किंवा स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा असतो.
3/8

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मानवी शरीरात स्मरणशक्ती कमी होते, अगदी दररोजच्या लहानसहान गोष्टीही विसरतात. त्यामुळे जर तुम्हालाही म्हातारपणी हा आजार टाळायचा असेल, तर व्हिटॅमिन बी12 युक्त आहार घेणं सुरू करा.
4/8

व्हिटॅमिन बी 12 आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे, परंतु काहीवेळा बॅड बॅक्टेरिया, अँटीबायोटिक्सचे जास्त सेवन किंवा कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे या जीवनसत्वाची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे व्हिटॅमिन बी 12 शरीरात शोषलं जात नाही.
5/8

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास स्मरणशक्ती कमी होणं, तसेच एचआयव्ही सारख्या आजारांचाही धोका संभवतो.
6/8

इतकंच नाही तर हाडांमध्ये वेदना होऊ शकतात, मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि शरीराच्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचण्यात अडचण येते.
7/8

शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असल्यास, चक्कर येणं, भूक न लागणं, फिकट गुलाबी त्वचा, मूड बदलणं, तणाव, जास्त थकवा, वजन कमी होणं, हाता-पायांना मुंग्या येणं, हृदयाचे ठोके वेगानं पडणं यांसारखी लक्षणं आढळून येतात.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 09 Dec 2024 08:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
