Manoj Parmar : आठ दिवसांपूर्वी ईडीची छापेमारी, उद्योजकाचा पत्नीसह शेवट; चिट्टीत उल्लेख, ईडी अधिकारी म्हणाला, भाजपमध्ये असता, तर केसच झाली नसती!
न्याय यात्रेदरम्यान मनोज परमार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पिगी बँक भेट दिली होती. यानंतर ते चर्चेत आले होते. या घटनेपासून ते भाजपचे लक्ष्य असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सिहोर (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील आष्टात व्यापारी मनोज परमार आणि त्यांची पत्नी नेहा यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आठ दिवसांपूर्वी, 5 डिसेंबर रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) इंदूर आणि सिहोर येथील परमार यांच्या चार ठिकाणांवर छापे टाकले होते. अनेक जंगम आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय साडेतीन लाख रुपयांची बँक बॅलन्सही गोठवण्यात आला होता. हे प्रकरण पंजाब नॅशनल बँकेत 6 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आहे. यामध्ये परमार यांना अटक करण्यात आली होती. यानंतर ते भीतीच्या छायेत होते.
राहुल गांधी पिगी बँक भेट दिल्याने चर्चेत
न्याय यात्रेदरम्यान मनोज परमार यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना पिगी बँक भेट दिली होती. यानंतर ते चर्चेत आले होते. या घटनेपासून ते भाजपचे लक्ष्य असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. एसडीओपी आकाश अमळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून पाच पानी सुसाईड नोट सापडली आहे.
मुलगा म्हणाला, ईडीने मानसिक दबाव निर्माण केला
मनोज परमार यांना तीन मुले आहेत. मुलगी जिया (18), मुलगा जतीन (16) आणि यश (13) जतीन म्हणाला की,, 'ईडीच्या लोकांनी मानसिक दबाव निर्माण केला होता. यामुळे पालकांनी आत्महत्या केली. मनोजचा भाऊ आणि हर्षपूरचे सरपंच राजेश परमार यांनी सांगितले की, मनोजवर ईडीचा मानसिक दबाव होता. यापूर्वीही ही कारवाई झाली होती, त्यामुळे ते नाराज झाले होते. याशिवाय भाजपचे लोकही त्यांना त्रास देत होते, त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलले.
सुसाईड नोटमध्ये ईडी अधिकाऱ्यांवर अत्याचारासोबतच मोठे आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज परमार यांनी 5 पानी सुसाईड नोट टाकली आहे. 7 पाँईटच्या या नोटमध्ये 5 डिसेंबर रोजी ईडीच्या छाप्याबद्दल लिहिले आहे. अधिकाऱ्यांवर छळवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- 5 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजता ईडीने छापा टाकला. माझ्या घरी एकही कागद शिल्लक राहिला नाही. तर काहींनी 10 लाख रुपये, दागिने आणि मूळ कागदपत्रे काढून घेतली.
- ईडीचे सहाय्यक संचालक संजीत कुमार साहू यांनी शिवीगाळ केली. मारहाण केली. भगवान शंकराची मूर्ती नष्ट झाली. म्हणाले की, तुम्ही भाजपमध्ये असता तर तुमच्यावर केस झाली नसती.
- ईडीचे सहाय्यक संचालक संजीत कुमार साहू माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाले, तुमच्या मुलांना भाजपमध्ये आणा. राहुल गांधींच्या विरोधात व्हिडिओ बनवा.
- कोणतेही स्टेटमेंट न घेता स्वतः लिहिले, माझी सहीही घेतली. घरातून मोबाईल फोन आणि कागदपत्रे काढून घेतली.
- अधिकारी पुन्हा पुन्हा सांगत होते, मी इतकी कलमे जोडेन की राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावरही ते हटवू शकणार नाहीत. त्यामुळे प्रकरण मिटवा आणि मोकळे व्हा.
- सर्वजण निर्दोष असल्याचे मी सांगितले पण त्यांनी ऐकले नाही.
- राहुल गांधींना विनंती आहे की, मी गेल्यानंतर मुलांची काळजी घ्या. मुलांना एकटे सोडू नका.
कुटुंबीयांनी सांगितले की, मनोज गुरुवारी पत्नी आणि मुलांसह सुसनेरजवळील बगलामुखी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. रात्री आठच्या सुमारास घरी परतले. तिन्ही मुलांना शांतीनगर येथील एका घरात झोपवले. या घराजवळ बांधलेल्या दुसऱ्या घरात पत्नी नेहासोबत झोपायला गेले. शुक्रवारी सकाळी उशिरापर्यंत दोघेही न आल्याने मोठा मुलगा जतीन त्यांना पाहण्यासाठी तेथे गेला. खोलीचा दरवाजा अडकला होता. आत गेल्यावर ते लटकलेले दिसले. त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना माहिती दिली. पोलिसांनाही बोलावले. सकाळी साडेआठच्या सुमारास घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांना खाली उतरून शवविच्छेदनगृहात पाठवले.
इतर महत्वाच्या बातम्या