Food : काय सांगता! तेलाचा एक थेंबही वापरता जात नाही, असा 'हा' 3 प्रकारचा नाश्ता, फक्त चवीसाठीच नाही.. आरोग्यासाठीही चांगला!
Food : हेल्दी किंवा बिना तेलाचा नाश्ता ही आजकाल अनेकांची पहिली पसंती बनली आहे. आज आम्ही अशा 3 नाश्त्याबद्दल सांगणार आहोत, जे बनवण्यासाठी तेलाचा एक थेंबही वापरत नाही.
Food : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय, ज्याच एक मुख्य कारण जंकफूड जास्त प्रमाणात खाणं हे देखील आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाबासारखे आजार तरुणवयात अनेकांन जडतायत. ज्यामुळे अनेक लोक आता निरोगी जीवनशैलीकडे वळत चाललेत. एकीकडे कोलेस्टेरॉलचे वाढते प्रमाण आणि हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे दिवसेंदिवस चिंता वाढत आहे. तिथे हेल्दी किंवा बिना तेलाचा नाश्ता ही आजकाल अनेकांची पहिली पसंती बनली आहे. आज या लेखात आम्ही अशा 3 नाश्त्याबद्दल सांगणार आहोत जे बनवण्यासाठी तेलाचा एक थेंबही वापरत नाही.
अनेक आजारांचे खरे मूळ कारण म्हणजे खाण्याच्या अयोग्य सवयी
आपल्या खाण्याच्या सवयी हे एक-दोन नव्हे तर अनेक आजारांचे खरे मूळ आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला तेलाशिवाय बनवलेल्या काही चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्त्याबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही घरी सहज तयार करू शकता. हे बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि तासन्तास किचनमध्ये उभे राहावे लागत नाही. झिरो ऑइल ब्रेकफास्टसाठी 3 उत्तम पर्याय पटकन जाणून घेऊया.
ओट्स उपमा
तेल नसलेल्या ब्रेकफास्टमुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य तर सुधारतेच, पण ते लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करते. अशा परिस्थितीत तुम्ही ओट्सचा उपमा बनवून खाऊ शकता. यासाठी गरम पाण्यात ओट्स टाकून त्यात कांदा आणि टोमॅटोसह तुमच्या आवडत्या भाज्या घालाव्या लागतील. यानंतर 5-10 मिनिटे शिजल्यावर त्यात तिखट, हळद आणि मीठ इ. घालून अजून थोडा वेळ शिजवा. तेलाशिवाय बनवलेला हा ओट्स उपमा तुमच्या जिभेला नक्कीच छान लागेल.
पनीर कॉर्न सॅलड
जर तुम्हाला नाश्त्यात हेल्दी आणि चविष्ट काहीतरी खायचे असेल तर पनीर कॉर्न सॅलड हा देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी तुम्हाला एक नॉन-स्टिक पॅन घ्यावा लागेल आणि त्यात पनीरचे तुकडे सोनेरी तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या आणि त्यानंतर चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कॉर्न घालून मिक्स करा. आपण आपल्या आवडीनुसार मसाले आणि मीठ घालू शकता. शेवटी, चाट मसाला, काळी मिरी आणि लिंबाचा रस घालून सजवता येते.
बटाटा पोळी
ही पोळी तेलाशिवाय बनवली जाते, पण इथे आम्ही तुम्हाला बटाट्याची पोळी कशी बनवायची ते सांगत आहोत. होय, यासाठी तुम्हाला प्रथम बटाटा उकडावा लागेल आणि नंतर तो बारीक करून त्यात सर्व मसाले घालावे लागतील. यानंतर पीठ मिक्स करून, पीठ मळून घ्या आणि त्यापासून बनवलेल्या पोळ्या नॉन-स्टिक तव्यावर एक-एक करून बेक करा. विशेष म्हणजे या पोळ्या खाण्यासाठी तुम्हाला भाजीचीही गरज नाही. दही किंवा चटणी सोबतही याची चव अप्रतिम लागते.
हेही वाचा>>>
Food : श्रावण महिन्यात काय खावं? काय खाऊ नये? थकवा, अशक्तपणा टाळण्यासाठी आहार काय असावा?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )