Nalasopara Crime : डोळ्यावर पट्टी बांधून शरीरसंबंध ठेवायला राजी केलं, सावत्र बापाला गाफील ठेवून मुलीने गुप्तांगावर केले वार, नालासोपऱ्यातील घटना कॅमेऱ्यात कैद
Nalasopara Crime Video: नालासोपारा पूर्वच्या बावशेत पाडा परिसरात ही घटना घडली आहे. सावत्र बापाने आपल्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे.

नालासोपारा : नालासोपारामधून सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला (Nalasopara Crime News) केल्याची सांतापजनक घटना समोर आली आहे. सावत्र बापाकडून वारंवार होणारे अत्याचार याला कंटाळून तरुणीने सावत्र वडिलावर चाकूने हल्ला करत त्याला जखमी केल्याची घटना नालासोपाऱ्यामध्ये घडली आहे. या मुलीने तिच्या सावत्र बापाच्या गुप्तांगावर आणि संपूर्ण शरीरावर चाकूने वार केल्याने (Nalasopara Crime News) आरोपी वडील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपारा पूर्वच्या बावशेत पाडा परिसरात ही घटना घडली आहे. सावत्र बापाने आपल्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे. त्यामुळेच संतापलेल्या मुलीने चाकूने सावत्र बापाच्या शरीरावर आणि गुप्तांगावर वार करून त्याला जखमी केलं.(Nalasopara Crime News)
दोन वर्षापासून तिच्यावर अत्याचार...
संतोष भवनच्या बावशेत पाडा येथील एका चाळीत काल (सोमवारी, ता 25) दुपारी सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने वडिलांवर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात (Nalasopara Crime News) ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबईच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने दुसरं लग्न केले होतं. तिचे सावत्र वडील रमेश भारती हे दोन वर्षापासून तिच्यावर अत्याचार करत होते. सोमवारी देखील त्यांनी तिच्यावर शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. त्यानंतर तिने हल्ला करण्याचं ठरवलं. शरीरसंबंध ठेवण्यासाठी लाज वाटते, असे सांगून तिने तिच्या वडिलांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर तिने अचानक हल्ला (Nalasopara Crime News) केला.
या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल...
रक्तबंबाळ अवस्थेत सावत्र वडील रमेश भारती घराबाहेर पडले. तेव्हा तिने त्यांना रस्त्यात गाठून पुन्हा त्यांच्यावर वार केले. माझ्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याने मी त्यांच्यावर हल्ला केला, असे तिने लोकांना सांगितले. तुळींज पोलिसांनी त्या तरुणीला ताब्यात घेतले आहे, त्याचबरोबर ते पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या अल्पवयीन मुलीच्या हातात चाकू (Nalasopara Crime News) दिसत असून तिचा बाप समोर रक्तबंबाळ होऊन पडला आहे. यावेळी जमलेले नागरिक त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं आहे. तू हातातला चाकू फेकून दे, पोलिस तुला न्याय देतील असं त्या मुलीला सांगताना नागरिक दिसत आहेत. यानंतर त्या मुलीने चाकू फेकून दिला आणि नंतर जमलेल्या नागरिकांनी त्या आरोपी बापाला रुग्णालयात दाखल केलं.
नराधम बापाचे गुप्तांग कापलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी आणि मुलगी ही नालासोपारा पूर्वच्या संतोषभवन येथील सर्वोदय नगर चाळीत राहतात. या मुलीच्या आईचे आरोपी रमेश भारती सोबत दुसरे लग्न झालेले आहे. आरोपी हा त्याच्या सावत्र मुलीवर शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. आताही तसाच प्रकार घडल्यानंतर मुलीने आरोपीवर चाकूने वार करत हल्ला केला आणि त्याचे गुप्तांग कापले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लगेच धाव घेतली आणि त्या मुलीला ताब्यात घेतले. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
