एक्स्प्लोर

Hair Growth : केस लांब आणि चमकदार बनवायचे आहेत? करा 'हा' घरगुती उपाय

Hair Care Tips : उन्हाळ्यात गरमीमुळे घाम येऊन केस अधिक खराब होतात. परिणामी केस तुटण्यास किंवा गळण्यास सुरुवात होते. यापासून सुटका मिळवायची असेल तर हे नक्की वाचा.

Hair Growth Tips : आपले केस मजबूत आणि सुंदर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. महिला असो वा पुरुष प्रत्येक जण केसांची योग्य निगा राखण्याचा प्रयत्न करतात. अनेकांना केस गळण्याची समस्या जाणवते. केस लांब आणि चमकदार होण्यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय करुन पाहतो. उन्हाळ्यामध्ये केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण उन्हामुळे घाम येऊन केस लवकर खराब होतात. अशा धुळीमुळे केसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.

केस गळती थांबवण्यासाठी दररोज फक्त 5 मिनिटे वेळ काढून 'हे' करा म्हणजे केस गळतीपासून सुटका मिळेल.

केसांबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
केसगळतीबद्दल महत्त्वाची गोष्ट तुम्हांला माहित नसेल की, सामान्यपणे निरोगी व्यक्तीचे एका दिवसात 70 ते 100 केस गळतात. हे सामान्य आहे. त्यामुळे केस गळण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. मात्र जर तुम्ही तुमच्या केसांमध्ये हात घातला आणि जर मूठभर केस तुमच्या गळून येत असतील तर तुम्हाला याकडे लवकरच लक्ष देण्याची गरज आहे. याचाच अर्थ असा की तुम्हांला तुमच्या केसांना पोषण देण्याची आणि देखभाल करण्याची गरज आहे.

फक्त 5 मिनिटे करा 'हे' काम
तुमच्या केसांच्या लांबीनुसार दररोज कोरफडीचे पान घ्या. याचे जेल काढा. कोरफडीच्या पानाच्या आतील गर काढून घ्या. एका मिक्सरच्या भांड्यात कोरफडीचा गर आणि थोडे पाणी घालून हे एकत्र वाटून घ्या. नंतर हे मिश्रण गाळून काचेच्या बरणीत भरा. या प्रकारे कोरफडीचे जेल तयार होईल. तुम्ही हे जेल रोज केसांवर वापरू शकता. हे कोरफडीचे जेल पाच ते सहा दिवस ताजे राहते. तुम्ही कोरफडीचे रोप घरात किंवा गॅलरीमध्ये एका भांड्यात लावू शकता. यामुळे तुम्हांला कोरफड सहज उपलब्ध होईल आणि तुम्हाला कोरफडीवर पैसे खर्च करण्याची गरज भासणार नाही.

असा करा वापर
रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांना एलोवेरा जेल लावू शकता. जेल सुकल्यावर तुम्ही आरामात झोपू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला हवे असल्यास सकाळी आंघोळीच्या 20 मिनिटे आधी कोरफडीचे जेल केसांना लावा आणि नंतर शॅम्पू करा.

जर तुमचे केस खूपच कोरडे असतील तर तुम्ही हे जेल शॅम्पूनंतर केसांना कंडिशनर म्हणून वापरू शकता. शॅम्पू केल्यानंतर, हे जेल केसांना लावा आणि नंतर दोन मिनिटांनी केस पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक चमक मिळेल. मात्र केसगळती थांबवायची असेल तर हे जेल रात्री किंवा शॅम्पूच्या 20 ते  30 मिनिटे आधी लावा आणि त्यानंतर धुवा.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 07 OCT 2024 : 07 PM : ABP MajhaAkola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 8 PM 07 October 2024Vare Nivadnukiche Superfast News: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 07 ऑक्टोबर 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर
MP Vishal Patil Vs Sanjay Patil : तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यात मोगलाई लागली नाही, येत्या काही काळात आम्ही दाखवून देऊ; रोहित पाटलांकडून संजय पाटलांना ओपन चॅलेंज!
Embed widget