Health Tips :वजन वाढेल, दातही खराब होतील! कोल्ड्रिंक्सच्या सेवनाने पोहोचेल आरोग्याला हानी, जाणून घ्या..
Health Tips :उन्हाळा आला की, कोल्ड्रिंक्स पिण्याचा सपाटा लागतो. कोल्ड ड्रिंक फक्त थंडच नाही, तर त्याची चवही खूप छान असते. पण, हेच थंड पेय तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही.
Health Tips : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळा आला की, आपण अधिकाधिक थंड पदार्थांचे सेवन करू इच्छितो. अशा स्थितीत कोल्ड्रिंक्सचा विचार पहिला येतो. कोल्ड ड्रिंक फक्त थंडच नाही, तर त्याची चवही खूप छान असते. अशा परिस्थितीत लोक दिवसातून अनेक वेळा थंड पेय पितात. एवढेच नाही तर, घरात पाहुणे आले किंवा आपण पाहुणे म्हणून कुठेही गेलो तरी आपल्याला फक्त कोल्ड ड्रिंक्स प्यायला आवडते. लहान मुले असोत की मोठी माणसं, प्रत्येकालाच कोल्ड ड्रिंक्स आवडते. पण ही थंड पेय आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण तर वाढतेच, पण ते आरोग्याला इतरही अनेक प्रकारे हानी पोहोचवते.
वजन वाढणे : जर तुम्ही कोल्ड्रिंकचे जास्त सेवन केले, तर तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. साखरेच्या सेवनामुळे वजन वाढण्यापासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. एका ग्लास कोल्ड्रिंकमध्ये आठ ते दहा चमचे साखर असते. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स पिऊन तुम्ही तुमच्या आहारात साखर वाढवता, जी आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारे चांगली नाही. एक ग्लास कोल्ड ड्रिंकमध्ये जवळपास 150 कॅलरीज असतात. दररोज इतक्या कॅलरीजचे सेवन केल्याने तुमचे वजन वाढते आणि आरोग्याशी संबंधित समस्याही निर्माण होतात.
फॅटी लिव्हरची समस्या : कोल्ड ड्रिंक्सच्या सेवनानेही फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. कोल्ड ड्रिंक्समध्ये दोन प्रकारची साखर आढळते. ग्लुकोज आणि फ्रक्टोज. ग्लुकोज शरीरात त्वरीत शोषले जाते आणि चयापचय होते. दुसरीकडे, फ्रक्टोज फक्त यकृतामध्ये साठवले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही दररोज कोल्ड ड्रिंक्स पीत असाल तर, तुमच्या यकृतात फ्रक्टोज जास्त प्रमाणात जमा होईल आणि त्याचा परिणाम यकृतावर होईल. त्यामुळे यकृताची समस्या निर्माण होईल.
मधुमेहाची समस्या : कोल्ड्रिंक्समध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे कोल्ड्रिंक्सचे सेवन केल्याने देखील मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. कोल्ड ड्रिंक्समुळे शरीरातील साखर लगेच वाढते, ज्यामुळे इन्सुलिन वेगाने बाहेर पडतो, परंतु जर तुम्ही इन्सुलिन हार्मोनला वारंवार त्रास देत असाल तर त्याचे नुकसान होते.
दातांवर परिणाम : हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे की, जर आपण कोल्ड्रिंक्सचे जास्त सेवन केले तर त्याचा परिणाम आपल्या दातांवरही होतो. फॉस्फोरिक अॅसिड आणि इतर प्रकारचे अॅसिड कोल्ड ड्रिंक्समध्ये आढळतात, ज्यामुळे आपल्या दातांना नुकसान होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
- Health Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )