Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
Health Tips : आपल्याला सगळीकडे पपई अगदी सहज मिळते. केळीच्या सेवनाने शरीराला भरपूर पोटॅशियम मिळते. पण केळी आणि पपई एकत्र खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
Health Tips : पपई (Papaya) हे एक असे फळ मानले जाते, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. असं म्हणतात की, पपई नियमित खाल्ल्याने पोटाच्या बहुतेक समस्या दूर होतात. तसेच, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त मानले जाते. पपई कच्ची आणि शिजवलेली दोन्ही प्रकारात वापरली जाते. तर, केळ्यांबद्दल (Banana) बोलायचे झाले तर, केळ्यामध्येही अनेक पोषक घटक आढळतात. केळीच्या सेवनाने शरीराला भरपूर पोटॅशियम मिळते. जे स्नायूंना मजबूत ठेवण्यास मदत करतात. पण केळी आणि पपई एकत्र खाऊ शकतो का? दोन्ही फळं एकत्र खाल्ल्याने काय नुकसान होतं? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
केळी आणि पपई एकत्र खाऊ शकतो का?
केळी आणि पपई एकत्र खाणे फायदेशीर आहे की नाही, हे तुमच्या पचनसंस्थेवर अवलंबून असते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. अनेकांची पचनशक्ती कमजोर असते. त्यामुळे केळी आणि पपई एकत्र खाल्ल्यास त्यांच्या समस्या वाढतात. ज्यांची पचनशक्ती चांगली असते त्यांना हा त्रास जाणवत नाही. आयुर्वेदानुसार, केळी आणि पपई हे एकमेकांचे विरुद्ध फळ मानले जातात. अशा वेळी आयुर्वेद देखील त्यांना एकत्र खाण्याची शिफारस करत नाही. हे एकत्र खाल्ल्याने पचनाशी संबंधित आजार वाढतात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अपचन, उलट्या, मळमळ, गॅस आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
'या' लोकांनी केळी आणि पपई खाऊ नये :
ज्या व्यक्तींना दमा किंवा श्वसनाचे कोणतेही आजार असतील तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पपईचे सेवन करावे. पपईमध्ये पपन नावाचे तत्व असते, ज्यामुळे काही लोकांना ऍलर्जीची तक्रार असते. जर अशा व्यक्तींनी पपई खाल्ली तर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर काविळच्या रुग्णांनाही पपई न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले पपेन आणि बीटा कॅरोटीन काविळीची समस्या वाढवू शकतात. याशिवाय गर्भवती महिलांना पपईचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. पपई आणि केळीचे मिश्रण देखील गर्भवती महिलांसाठी योग्य नाही. सर्दी झाली तरी केळी आणि पपई खाणे टाळावे. कारण यामुळे तुमची समस्या वाढू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
- Health : 'या' आयुर्वेदिक औषधी करतील शारीरिक दुर्बलेवर मात, अनेक रोगांवर प्रभावी
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha