एक्स्प्लोर

Mother's Day 2024 : आईपण अनुभवल्याशिवाय आईच्या भूमिका गाजवणाऱ्या नायिका, कशी आहे ऑनस्क्रिन आईची गोष्ट?

Mother's Day 2024 : मातृदिनानिमित्ताने मालिकाविश्वातील अभिनेत्रींनी त्यांचा ऑनस्क्रिन मातृत्वाचा अनुभव शेअर केला आहे. 

Mother's Day 2024 : आई ही प्रत्येकाच्या जीवनाचा आधारस्तंभ असते. अशा या आईच्या उपकाराची जाणीव ठेवून जगभरात मातृत्व आणि मातांचा सन्मान करण्यासाठी ‘मदर्स डे’ (Mother's Day 2024) साजरा केला जातो. टीव्ही जगतात अश्या काही नायिका आहेत ज्यांनी खऱ्या आयुष्यात अजून आईपण अनुभवलं नाहीये पण त्या खूप सहज सुंदरपणे स्क्रीनवर आईची भूमिका साकारत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं सगळ्यात महत्त्वाचं स्थान असतं. पण आईपण अनुभवल्याशिवाय आईची भूमिका करण्याचा अनुभव कसा होता याविषयी या अभिनेत्रींनी भाष्य केलं आहे. 

अप्पीच्या प्रेग्नेंसी पासूनच आईपण आपणच अंगात आलं - शिवानी 

अमोलच्या आईची भूमिका साकारत असलेली अप्पी म्हणजेच  शिवानी नाईक, "अप्पीच्या प्रेग्नेंसी पासूनच आईपण आपणच अंगात आलं होतं. माझ्या मते प्रत्येक बाई मध्ये आईपण असतंच. मालिकेत अप्पीचा पूर्ण प्रवास दाखवलाय, ती लग्नाच्या आधी कशी होती, तिचा कलेक्टर होण्याचा प्रवास, लग्नानंतरचा प्रवास आणि आता तिच्या पदरात आईपण आलं आहे. मी अप्पीचा प्रवास प्रत्येक वाटचालीवर अनुभवला आहे आणि जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ही हावभावांची काळजी घेणं त्यानंतर ही जेव्हा अप्पीच बाळ गेलंय ह्यावर तिचा विश्वास न बसणे, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही बारीक लक्ष दिले आहे. आता 7 वर्ष नंतरही अप्पीने  एकटीनेच अमोलच संगोपन केलंय, त्याला चांगले छान संस्कार दिलेत, त्याला हुशारी ही तिकीच शिकवली आहे. अप्पीची भूमिका पहिल्यापासून निभावत आहे म्हणून तिचा पूर्ण प्रवास जगायला मला खूप आवडत आहे. खूप मज्जा येतेय आईपण स्क्रीनवर साकारायला." 

शिवानीने आपल्या आई बद्दल म्हटलं की 'घरात आई आणि आम्ही दोघी बहिणी म्हणजे ३ बायका नारी शक्ती वालं घर आहे आमचं . त्यात आईनी आम्हाला खूप छान शिकवण आणि संस्कार दिले  आहेत. आपण समंजसपणे वागलं पाहिजे उगाच अरेरावी करून काही होतं नाही तेवढा समंजसपणा एका बाई मध्ये हवा हे आईनी शिकवले आहे. परिस्थितीला कसे सांभाळल पाहिजे हे  मी आई कडूनच शिकतेय. आईनी शिकवलेल्या आणि सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी घरातून बाहेर पडल्यापासून जास्त कळायला लागल्या आहेत. लीप नंतर अप्पीची खूप वाहवा होतं आहे खास करून तिच्या लुकची चर्चा होताना दिसतेय. अमोल बरोबरच्या सीन्सच ही खूप कौतुक होतं आहे आणि त्यामुळे आम्हा सर्वांची ऊर्जा अधिक वाढली आहे.'

मोठ्या मुलींची आई साकारणं नक्कीच आव्हानात्मक - शीतल क्षीरसागर

‘नवरी मिळे हिटलरला’ मध्ये लीलाच्या मावशी आईची भूमिका अभिनेत्री शीतल क्षीरसागर साकारत आहे. यावर तिने म्हटलं की, खऱ्या आयुष्यात माझं लग्न नाही झालंय आणि स्क्रीनवर इतक्या मोठ्या मुलींची आई साकारणं नक्कीच आव्हानात्मक आहे.  पण मला असं वाटत एक स्त्री असल्यामुळे तितकं कठीण नाही त्याच कारण असं की प्रत्येक स्त्री मध्ये नैसर्गिक आईपणाचे  गुण असतातच. मी माझ्या घरातली मोठी मुलगी आहे मला लहान भावंडं आहेत. माझे आई- वडील नोकरी करायचे त्यामुळे मी माझ्या लहान भावंडांना सांभाळताना कधी-कधी त्यांची आई व्हायचे.  ते वेळेवर जेवतायत का, आईनि सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे त्यांचा सांभाळ होतोयना ह्यासर्व  अनुभवांचा उपयोग मी भूमिका करताना करते. त्याशिवाय माझा भाचा ओजस हा माझा भाचा नसून माझ्या मोठा मुलगाच आहे. त्याच्यामुळे ही मी खूप सुंदर अनुभव घेतले आहेत. मी त्याला जन्म जरी दिला नसला तरी त्याच्या संगोपनात माझा खारीचा वाटा आहे.

माझ्या आईच आणि समाजात इतर आयांचं निरीक्षण करून मला रेऊ आणि लीलाची स्क्रीनवर आई निभावयला मदत होते . ह्या सगळ्यामुळे मला माझी आई सुद्धा नव्याने कळतेय.  मालिकेत कालिंदीच विश्व् म्हणजे ती आणि तिच्या  मुली आहेत आणि ती अशी असून ही लोक तिच्यावर  प्रेम करत आहेत. माझ्या आई मध्ये असलेली प्रचंड ऊर्जा खूप प्रेरणादायी आहे. आता ती 72 वर्षाची आहे, पण मला लाजवेल इतकं अखंड काम ती करत असते आणि तिचं प्रत्येक काम नीटनेटकं असतं. कामात स्वतःला झोकून देणं, स्वछता प्रिय असणे गोष्टी जागच्या जागी ठेवणे हा तिचा स्वभाव माझ्यात आला आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे माझी आई गॉसिप करत नाही आणि तिला ते ऐकायला ही आवडत नाही आणि ही सर्वात मोठी शिकवण आहे जी मला आई कडून मिळाली आहे. 

स्त्रियांमध्ये जन्मजातच ममता असतेच - अक्षया हिंदाळकर

'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये बनीच्या आईची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री अक्षया हिंदाळकर हीने म्हटलं की, 'मला असं कायम वाटतं की स्त्रियांमध्ये जन्मजातच ममता असतेच.  म्हणून मला असं जास्त काही वेगळं करावे नाही लागलं. ऑफकोर्स काही प्रोसेस मधून जावे लागलं.  माझा छोटा भाऊ आहे जो माझ्या मामाचा मुलगा आहे तो माझ्या आयुष्यात आल्यावर मला आईपण काय आहे ते जाणवलं. आमच्या मालिकेचे दिर्दर्शक शैलेश सर त्यांनी खूप छानपणे माझ्या मधली आई स्क्रीनवर साकारण्यात मदत केली आहे. वसूचे पात्र माझ्यापेक्षा 7-8 वर्ष मोठं आहे आणि तिचा तेवढाच मोठा मुलगा आहे. तर ती भावना रोज स्क्रीनवर साकारायची ह्यावर नक्की मला मेहनत करावी लागली पण आईपणाची भावना आत होतीच. जेव्हा मला ही भूमिका मिळाली होती तेव्हा मुळात मी वसुंधरेच्या नावच्याच  प्रेमात पडली होती.

माझ्या आई कडून मला ताकत मिळाली - मुग्धा कर्णिक

‘पारू’ मालिकेतील आदित्य आणि प्रीतम किर्लोस्करची आई अहिल्यादेवी म्हणजेच  मुग्धा कर्णिक " मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण जे आपण खऱ्या आयुष्यात नाही आहोत ते स्क्रीनवर साकारण्याचं आव्हान मला खूप आवडतं. भूमिका जर अप्रतिम असेल तर लहान मुलांची आई असो किंवा मोठ्या मुलांची आई त्याने जास्त काही  फरक नाही पडत. मी भूमिकेच्या प्रेमात पडून त्यात जे घडवायचे आहे ते स्क्रीनवर आपण किती चांगलं दाखवू शकतो त्यासाठी मेहनत करते, म्हणून मला फरक नाही पडत की मी किती मोठयामुलांची आई साकारत आहे. माझ्या आई कडून मला ताकत मिळाली आहे. तिच्याकडे असलेला कणखरपणा जो आहे,  कितीही कठीण  वेळ आली तरी त्याला सामोरे जायचे. कधी मी तिला प्रॉब्लेम्सला घाबरताना पहिले नाही कारण तीच म्हणणं आहे की अडचणी सोडवायच्या असतात. 

पुढे तिने म्हटलं की, 'मी कामाची नैतिकताही तिच्याकडून शिकले,  तिला तिचं काम खूप आवडतं माझी आई ३५ वर्ष जे.जे हॉस्पिटल मध्ये आनंदानी काम करत राहिली कधी कंटाळा केला नाही. आदित्य आणि प्रीतमच्या आईच्या भूमिकेसाठी एक प्रतिक्रिया जी मला सगळ्यांकडून मिळते की अय्यां किती लहान दिसतेस तू, किती मोठी मुलं दाखवली आहेत मालिकेत. अहिल्याच्या भूमिकेची तारीफ करताना प्रेक्षक हे ही बोलतात की खऱ्या आयुष्यात तुम्ही अजून आईपण अनुभवले नाही, पण इतक्या उत्तमपणे अहिल्याची साकारत आहात.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget