एक्स्प्लोर

Bigg Boss 16 :प्रियांका आणि शिव यांच्यात रुम ऑफ 4 वरून वॉर; दोघांचंही एकमेकांना ओपन चॅलेंज

Bigg Boss 16 : बिग बॉसच्या रुम नं. 2 आणि 6 बंद करण्याच्या निर्णयानंतर, शिव आणि प्रियांका यांच्यात जोरदार भांडण झालं आहे.

Bigg Boss 16 : हिंदी रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीझन 16' (Bigg Boss 16) चा फिनाले जवळ आला आहे. अशातच आता या शोमध्ये येणारे ट्विस्ट वाढत चालले आहेत. त्याबरोबरच स्पर्धकांचे इक्वेशन्सही दिवसेंदिवस बदलताना दिसतायत. त्याबरोबरच स्पर्धकांची भांडणं नेहमी चर्चेचा विषय ठरतात. कालच्याच एपिसोडमध्ये शीव आणि प्रियांका या दोन स्पर्धकांचं भांडण चर्चेचा विषय ठरला. 

बिग बॉसच्या घरातील शिव ठाकरे आणि प्रियांका हे एकमेकांचे कट्टर वैरी आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण शोच्या सुरुवातीपासूनच दोघांमधील वाद काही मिटण्याचं नाव घेत नाहीत. मध्यंतरीच्या काळात हा वाद मिटून दोघं एकत्र खेळताना दिसतील, असं वाटतं होतं. पण पुन्हा त्यांच्या वादाची ठिणगी पडलीच. त्यासाठी कारण ठरला बिग बॉसचा रुम नं. 2 आणि 6 बंद करण्याचा निर्णय. 

26 जानेवारीच्या एपिसोडमध्ये, रूम ऑफ 4 वरून शिव आणि प्रियांका यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, दोघांनीही एकमेंकांचे इगो काढून थेच सर्वांसमोर तुझं खरं रूप आणण्याचं ओपन चॅलेंजच एकमेकांना दिलं.

बिग बॉसच्या घरात प्रियांका आणि शिवमध्ये वाद 

खरंतर बिग बॉसने रूम नं. 2 आणि 6 कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोण-कोणासोबत राहणार याचा निर्णय बिग बॉसनी स्पर्धकांवर सोडला. त्यानंतर प्रियांकाने सांगितले की, तिला फक्त रूम नंबर 4 मध्येच राहायचंय. ती तिची रूम अजिबात सोडणार नाही. त्याचवेळी अर्चना म्हणाली, मला रूम नं. 3 मध्येच रहायचंय. यावर बोलताना शिवनं आपली बाजू मांडली आणि त्यानं "तुम्ही तीन मुली रूम नं. 3 मध्ये राहू शकता. मला थंडीचा त्रास आहे, म्हणून मला रूम नं. 4 हवी आहे." पण प्रियांका कोणाचंच ऐकायला तयार नव्हती. प्रियांकानं मी माझी रुम सोडणार नाही, असं ठामपणे सांगितलं आणि झालं... शिव आणि प्रियांकामध्ये भांडण सुरू झालं. 

शिवला संताप अनावर झाला. कोणामध्ये हिंमत असेल तर या खोलीत झोपून दाखवाच, असं सांगत शिवनं रूम नं. 4 मध्ये मीच झोपणार, असं जवळपास जाहिरच करुन टाकलं आणि रुम नंबर 4 मधील बेडवरती जाऊन झोपला. त्यानंतर प्रियांका आणि टीना रूम नं. 4 मध्ये येऊन आपापला बेड अडवून बसल्या आणि वाद आणखी चिघळला. शिवनं दिलेल्या धमकीवरुन प्रियांका आणि टीना चिडल्या आणि तुझ्या घरचे धमकी ऐकत असतील आम्ही अजिबात ऐकून घेणार नाही, असं शिवला ठणकावून सांगितलं. 

तुझा इगो आतापर्यंत कोणी काढला नसेल तो मी काढतो, शिव ठाकरेचं प्रियांकाला थेट चॅलेंज

प्रियांका म्हणते की, आम्ही जेवत होतो, तेव्हा शिव उठला आणि निघून गेला, मग आम्ही याचा विचार का करावा?' यावर शिव म्हणतो की, ही एक नंबरची निगेटिव्ह मुलगी आहे. यानंतर शिव स्पष्टीकरण देताना म्हणतो, आम्ही जेवणाच्या टेबलवरून यासाठी उठलो कारण इतके दिवस जेवताना ती एकदाही आली नाही. मग आता जेव्हा आम्ही उठून गेलो, तेव्हा तिलाही वाटायला हवं की, किती त्रास होतो.

प्रियांका शिवला म्हणते की, तो माझ्याबद्दल वाईट बोलतोय. यानंतर शिव म्हणतो की, मी काहीही वाईट बोललो नाही. प्रियांका तुझं वास्तव आता समोर येईल. तेवढ्यात प्रियांका शिववर ओरडते की, आता रात्रभर बस तशीच. प्रियंका शिवला सांगते की मी इथेच आहे, टेन्शन घेऊ नकोस. शिव पण म्हणतो की, तू पण टेन्शन घेऊ नकोस, मी पण इथेच आहे. विथ रिस्पेक्ट तुझा इगो इथेच मोडेल. तर दुसरीकडे प्रियांकाचे म्हणणे आहे की, गेल्या 10 दिवसांपासून गर्ल कार्ड वापरून खेळतोय. यावर शिव तिला प्रतिउत्तर देतो आणि म्हणतो, 'तुझा इगो आतापर्यंत कोणी काढला नसेल तो मी काढतो.'

प्रियांका आणि टीनाने रूम नं. 4 सोडला 

या सर्व वादानंतर अर्चना प्रियांकाला तयार करते, तेव्हा टीना आणि प्रियांका रूम नं. 4 सोडतात आणि रूम नं. 3 मध्ये जाण्यास तयार होतात. पण, टीना म्हणते की, ती मेक-अप करण्यासाठी रूम नं. 4 मध्ये येणार. यावर शिवही सहमत होतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bigg Boss 16 : 'सिद्धार्थ शुक्लाची नक्कल करू नको..', शिव ठाकरेचा प्रियांका चौधरीवर निशाणा; ट्विटरवर प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget