Parveen Babi Birthday : आयुष्यात खूप काही कमावलं, पण शेवटी एकाकीच मरण आलं! वाचा अभिनेत्री परवीन बाबींबद्दल..
Parveen Babi : 1970 ते 1980 दरम्यान परवीन यांनी 'दीवार', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथनी' आणि 'शान' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.

Parveen Babi : बॉलिवूडच्या सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या परवीन बाबी (Parveen Babi) यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी जुनागढमध्ये झाला होता. परवीन बाबी यांची 19 वर्षांची बॉलिवूड कारकीर्द होती आणि या वर्षांत त्यांनी खूप नाव कमावले. परवीन जितक्या चित्रपटांमुळे चर्चेत असायच्या, त्यापेक्षाही त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त प्रसिद्ध झाल्या होत्या. परवीन यांचे नाव नेहमीच कोणा ना कोणाशी जोडले जात होते. पण त्यांच्या शेवटच्या वेळी कोणीही त्यांच्यासोबत नव्हते.
परवीन बाबी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1972मध्ये मॉडेलिंगपासून केली आणि लगेचच त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळाले. 1970 ते 1980 दरम्यान परवीन यांनी 'दीवार', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथनी' आणि 'शान' सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. परवीनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत आठ चित्रपटांमध्ये काम केले असून, हे सर्व चित्रपट हिट किंवा सुपरहिट ठरले. प्रसिद्ध ‘टाईम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री होण्याचा मानही परवीन बाबी यांनी मिळवला होता. 70च्या दशकातील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक त्या होत्या.
लव्ह लाईफही गाजली!
70च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेन्झोग्पा आणि परवीन बाबी 4 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण नंतर ते वेगळे झाले. यानंतर परवीन बाबींचे हृदय प्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांच्यावर आले. दोघांच्या नात्याच्या बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्या, मात्र पुन्हा एकदा त्यांचे मार्ग वेगळे झाले. 1977 मध्ये, परवीन त्यांच्या अभिनय कारकिर्दीच्या शीर्षस्थानी होत्या, तेव्हा त्या महेश भट्ट यांच्या प्रेमात पडल्या. मात्र, त्यावेळी महेश यांचे लग्न झाले होते, तरीही दोघे लिव्ह-इनमध्ये राहिले आणि नंतर महेश परवीनला सोडून पत्नीकडे परतल्याने हे नाते तुटले.
शेवटच्या क्षणी दुरावस्था!
परवीन बाबी यांना गंभीर मानसिक आजार जडला होता, त्यामुळे त्या सर्वांपासून दूर गेल्या. त्यांना स्किझोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराने ग्रासल्याचे सांगितले जाते. 20 जानेवारी 2005 रोजी त्यांचे निधन झाले. तीन दिवस त्यांचा मृतदेह पलंगावर पडून होता. तीन दिवस त्यांच्या दाराजवळ ब्रेड आणि दुधाचे सामान पडून होते, तेव्हा लोकांनी पोलिसांना कळवले. मात्र, तोपर्यंत त्यांनी या जगाचा निरोप घेतला होता.
हेही वाचा :
- Prithviraj : मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो केला शेअर, राजकुमारी संयोगिताचा रॉयल लूक
- Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार
- Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
