एक्स्प्लोर

संजय राऊत शरद पवारांकडे जाऊन माफी मागतील, रामदास कदमांचा प्रहार, म्हणाले ठाकरेंवर हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल

Ramdas Kadam on Sanjay Raut : पुढच्या दोन दिवसात संजय राऊत शरद पवारांची (Sharad Pawar) जाऊन माफी मागतील अशी टीका शिवसेना शिंदे गटचा नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली.

Ramdas Kadam on Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे केवळ प्रसिद्धीसाठी बोलतात, पुढच्या दोन दिवसात संजय राऊत शरद पवारांची (Sharad Pawar) जाऊन माफी मागतील अशी टीका शिवसेना शिंदे गटचा नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता. यावरुन संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावरुन आज रामदास कदमांनी राऊतांवर प्रहार केला. 

उध्दव ठाकरेंचं कर्तृत्व काय? रामदास कदमांचा सवाल

दोन दिवसात संजय राऊत शरद पवार यांची जाऊन माफी मागतील असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. संजय राऊत एकाच दगडात दोन पक्षी मारत आहेत.एकनाथ शिंदे यांचे कर्तृत्व आहे, म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. उध्दव ठाकरेंचं कर्तृत्व काय? असा सवाल देखील रामदास कदम यांनी केला. शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. आपण कोणावर टीका करत आहोत, याचे भान संजय राऊत यांनी ठेवायला हवं असंही रामदास कदम यावेळी म्हणाले. 

उध्दव ठाकरे यांच्या सोबत कोणीही राहणार नाही

राजन साळवी यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशावर देखील रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली. राजन साळवींचा पक्ष प्रवेश ही उध्दव ठाकरे यांना राजकीय कानफटात आहे. अशा अनेक कानफटात त्यांना खायच्या आहेत असंही कदम म्हणाले. राज्यातील अनेक नेते पक्ष प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. उध्दव ठाकरे यांच्या सोबत कोणीही राहणार नाही. शेवटी हम दो हमारे दो अशी परिस्थिती येईल असा टोला देखील रामदास कदमांनी लगावला. राजन साळवी यांनी उध्दव ठाकरे यांचा चेहरा उघडा पाडला असेही ते म्हणाले. ही फक्त नांदी आहे. अजून खूप काही बाकी आहे असे रामदास कदम म्हणाले. 

वैभव नाईक यांच्याशी देखील माझे चांगले संबंध 

शेवटपर्यंत सोबत राहिले पण उध्दव ठाकरे यांच्याकडेच सगळ संपत आहे हे राजन साळवी यांच्या लक्षात आलं आहे. उध्दव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे महाराष्ट्राला कळल्याचे रामदास कदम म्हणाले. राजन मला माझ्या भावाप्रमाणे आहे. यापूर्वी मी त्याला फोन केला असता तर तो कधीच आला असता असेही रामदास कदम म्हणाले. वैभव नाईक यांच्याशी देखील माझे चांगले संबंध असल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde Sharad Pawar: शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं केलेलं कौतुक उद्धव ठाकरेंना झोंबलं; राजकारण तापलं, पण नेमकं म्हणाले तरी काय?

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget