
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'केआरके' पब्लिसिटीला भूकेला माणूस, सलमान खान-कमाल आर खानच्या वादात मिका सिंहची उडी
सलमान खान आणि कमाल आर. खानच्या या वादात आता गायक मिका सिंहनं उडी घेतली आहे. त्यानं सलमानची बाजू घेत केआरकेवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि कमाल आर खान म्हणजेच केआरके यांच्यात सध्या चांगलाच वाद पेटलाय. केआरकेने त्याच्या युट्युब व्हिडिओमध्ये सलमानवर अनेक आरोप केले होते ज्याचा विरोध म्हणून सलमानने केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. दरम्यान सलमान खान आणि कमाल आर. खानच्या या वादात आता गायक मिका सिंहनं उडी घेतली आहे. त्यानं सलमानची बाजू घेत केआरकेवर जोरदार टीका केली आहे.
मिका सिंहनं एबीपी न्यूजशी बोलताना म्हटलं आहे की, "केआरके एक हलकट आणि पब्लिसिटीसाठी भूकेलेला माणूस आहे. त्याला असं वाटतं की सलमान सारख्या व्यक्तिनं त्याच्याबाबत काहीतरी बोललं पाहिजे कारण तो चर्चेत राहावा. तो अशा पद्धतीची वक्तव्य करुन आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात माहिर आहे, असं मिकानं म्हटलं आहे.
मिका सिंहनं म्हटलं आहे की, सलमान खाननं केआरकेनं 'राधे' चा रिव्ह्यू केला म्हणून नव्हे तर सलमानविरोधात वादग्रस्त वक्तव्य आणि बीईंग ह्युमन संस्थेला फ्रॉड म्हटल्यामुळं त्याच्याविरोधात केस केली आहे. मी केआरकेला चित्रपट समीक्षक मानत नाही. जर तुम्ही समीक्षक असाल तर चित्रपटाला नापसंती दर्शवण्याचा आपल्याला अधिकार आहे मात्र आपल्याला कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, असं मिकानं म्हटलं आहे. मी मित्रत्वाच्या नात्यानं त्याला सुधारण्याचा सल्ला दिला होता, मात्र तो सुधरला नाही, असं तो म्हणाला.
काय आहे प्रकरण
सलमान खान आणि कमाल आर खान म्हणजेच केआरके यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे. केआरकेने त्याच्या युट्युब व्हिडिओमध्ये सलमानवर अनेक आरोप केले होते ज्याचा विरोध म्हणून सलमानने केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. केआरकेने सलमानच्या 'राधे' ला निगेटिव्ह रिव्यू दिला होता. चित्रपट प्रदर्शनाच्या पूर्वीही केआरकेने चित्रपटाच्या विरुद्ध अनेक ट्वीट केले होते. केआरकेने त्याच्या ट्वीटमध्ये सलमानवर अनेक आरोप देखील केले. त्याने 'बिईंग ह्युमन फाऊंडेशन' ला खोटं सांगत पैसे उकळण्याचं एक माध्यम म्हटलं होतं. सलमानच्या कंपनी विरुद्ध चुकीची माहिती पसरवल्यामुळे सलमानने केआरकेविरुद्ध तक्रार दाखल केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
