एक्स्प्लोर
Bollywood Movies : बॉलिवूडचे 'हे' 7 सिनेमे चुकूनही पाहू नका, जाणून घ्या नेमकं कारण काय?
Bollywood Movies : बॉलिवूडमधल्या अशा काही सिनेमांविषयी जाणून घेऊयात जे कधीही न पाहणंच तुमच्यासाठी फायद्याचं ठरु शकतं.

Bollywood Movies
1/7

मैं प्रेम की दीवानी हूं: 2003 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात इंडस्ट्रीतील दोन मोठ्या स्टार्सनी काम केले होते. करीना कपूर आणि हृतिक रोशन. पण जर तुम्ही हा चित्रपट पाहिला तर तुम्हाला त्यांच्या अभिनयाविषयी फार वाईट वाटेल.
2/7

हिम्मतवाला : सध्या पुन्हा सिंघमच्या भूमिकेत गाजत असलेल्या अजय देवगणने या चित्रपटात काम केले होते. त्याच नावाच्या 80 च्या दशकातील ब्लॉकबस्टर चित्रपटाचा हा रिमेक एक फ्लॉप ठरला होता.
3/7

हमशकल्स: राम कपूर आणि सैफ अली खान सारख्या स्टार्ससोबत 2014 मध्ये एवढा वाईट चित्रपट बनला होता की चुकूनही तो पाहिला तरी तुमचा सैफवरील विश्वास उडेल. सैफने हा चित्रपट का केला हा एकच विचार तुमच्या मनामध्ये येईल.
4/7

लव्हस्टोरी 2050: हा चित्रपट 2008 साली प्रदर्शित झाला होता. याच वर्षी प्रियांका चोप्राने फॅशन हा शानदार चित्रपट केला होता. हा सिनेमा पाहिल्यानंतरही प्रियांकाच्या निवडीवर तुम्ही प्रश्न उपस्थित कराल..
5/7

शानदार: हा 2015 मधील सर्वात वाईट चित्रपटांपैकी एक होता. कदाचित हा शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट चित्रपटांपैकी एक असू शकतो.
6/7

खूबसुरत: 2014 साली आलेल्या या सिनेमात सोनम कपूर आणि फवादला घेऊन असा चित्रपट का बनवला गेला हाच प्रश्न पडेल.
7/7

हिरोपंती 2: टायगर श्रॉफच्या पहिल्या चित्रपटाचा हा सिक्वेल 2022 मध्ये आला होता. चित्रपट पाहताना सर्वात वाईट वाटतं की एवढ्या वाईट चित्रपटात एक नवाजुद्दीन सिद्दीकी सारखा अभिनेता होता.
Published at : 01 Dec 2024 10:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
