(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kangana Ranaut : कंगनाला हिमाचल प्रदेशातून भाजपकडून उमेदवारी, तर नेटकऱ्यांनी सुचवला विरोधी पक्षाचा उमेदवार
Kangana Ranaut : लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कंगनाला बऱ्याच ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागलंय. त्यातच आता नेटकऱ्यांनी विरोधी पक्षाला कंगनाच्या मतदारसंघातून एक उमेदवार देखील सुचवला आहे.
Kangana Ranaut : लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर देशभरात निवडणुकांचं वातावरण तयार झालं आहे. सध्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर केली जातेय. नुकतची भाजपची लोकसभा उमेदवारांची (Lok Sabha Candidate) पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आणखी काही कलाकारांची वर्णी लागली. कंगना रानौत (Kangana Ranaut) हिला हिमाचल प्रदेशातून तर अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी देण्यात आलीये. कंगनाला उमेदवारी दिल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र टीकेची झोड उठवली. इतकच नाही तर नेटकऱ्यांनी कंगनाच्या मतदारसंघातून विरोधी पक्षाचा उमेदवार देखील तयार केला आहे.
लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर कंगनाने पक्षाचे देखील आभार मानले. पण यावेळी कंगनाला बऱ्याच ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागल्याचं पाहायला मिळात आहे. त्यातच आता नेटकऱ्यांनी विरोधी पक्षाला कंगनाच्या मतदारसंघातून एक उमेदवार देखील सुचवला आहे. त्यामुळे आता कंगनाच्या विरोधात कोण उभं राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेटकऱ्यांनी सुचवला 'हा' उमेदवार
काही काळापूर्वी कंगना आणि हृतिक रोशनची जोरदार चर्चा सुरु होती. त्यांच्यातले वाद हे जगजाहीर होते. त्यामुळे नेटकऱ्यांनी विरोधी पक्षाने म्हणजेच इंडिया आघाडीने हृतिक रोशनला मंडीमधून कंगनाच्या विरोधात उभं करावं अशी मागणी केली आहे. हृतिक आणि कंगनाच्या वादानंतर अशा पद्धतीने नेटकऱ्यांनी कंगनाला पुन्हा एकदा ट्रोल केलं आहे.
Or can also be fielded #HritikRoshan also plzzz, it's on Public demand one on one. #INDIAAlliance #CongressList #CongressParty https://t.co/dAe6VBCIIx
— Aanand Ajeet AJ22 (@Aj22Aanand) March 25, 2024
INDIA please announce Hritik Roshan from Mandi 🙏🙏 https://t.co/mMk8TCUQB0
— Samsonian (@BestSamsonian) March 25, 2024
कंगना आणि हृतिकमधील वाद
काही काळपूर्वी कंगनाने हृतिकवर फार गंभीर आरोप केले आहेत. कंगनानं म्हटलं होतं की, हृतिकने तिला त्याच्या बायकोपासून घटस्फोट घेऊन तिच्याशी लग्न करण्याची गोष्ट केली होती. त्यामुळे या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आले होते. इतकच नाही तर कंगनानं पुढं म्हटलं होतं की, मी आज खूप नशीबवान आहे की माझं मुंबईत स्वत: चं घर आहे, पण माझा एक्स हृतिक रोशन हा भाड्याच्या घरात राहतो. दरम्यान यावर हृतिकने सुरुवातीला मौन बाळगलं होतं. पण त्यानंतर त्याने फेसबुक पोस्ट करुन हे सगळं खोटं असल्याचं सांगितलं.
CONGRESS announces its candidate from Mandi, HP. Shri Hritik Rakesh Roshan.
— Siddharth Gautam (@OmManiPadmeHoon) March 25, 2024
हृतिकभाऊ यांना प्रचंड मताने विजय करा.... pic.twitter.com/LY9YD3uC5X
देशाला गरज आहे म्हणून कंगनाला भाजपा कडून निवडणूक लढवायची असेल तर, I.N.D.I.A आघाडीने ‘हृतिक रोशन’ यांना उमेदवारी द्यावी!#KanganaRanaut #HrithikRoshan
— Vinit Vaidya (@hifrom_vinit) March 25, 2024
कंगनाला हिमाचल प्रदेशातून उमेदवारी
अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) हिला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपकडून तिला तिकीट देण्यात आलं आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगना लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कंगनाच्या निवडणुकीची चर्चा होती. त्यातच आता कंगनाला भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा लोकसभेसाठी सुरु होती. त्यात कंगनाचं नाव आघाडीवर होतं. त्यातच कंगनाच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे ती फार चर्चेत असते. त्यामुळे तिला भाजपमधून तिकीट मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला असून कंगना हिमाचल प्रदेशातून तिकीट देण्यात आलं आहे.