Bigg Boss Marathi 4 Live Updates : 'बिग बॉस मराठी 4'च्या ग्रँड प्रीमिअरला सुरुवात; जाणून घ्या बिग बॉस संबंधित सर्व अपडेट्स एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Bigg Boss Marathi 4 Live Updates : अभिनेत्री रुचिरा जाधव अन् नृत्य दिग्दर्शक रोहित शिंदे झळकणार 'बिग बॉस 16'मध्ये
Bigg Boss Marathi 4 Live Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे. रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे. पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. त्याने ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : इतिहासात पहिल्यांदाच चाहता गेला बिग बॉस मराठीच्या घरात; त्रिशूल मराठे आता खेळ खेळण्यासाठी सज्ज
Bigg Boss Marathi 4 Live Updates : इतिहासात पहिल्यांदाच बिग बॉस मराठीचा चाहता बिग बॉसच्या घरात गेला आहे. त्रिशूल मराठे आता बिग बॉसचा खेळ खेळण्यासाठी सज्ज आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : प्रसिद्ध लोककलावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सहभागी
Bigg Boss Marathi 4 Live Updates : लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी बिग बॉस गाजवल्यानंतर आता प्रसिद्ध लोककलावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे बिग बॉस मराठीचं चौथं पर्व गाजवायला सज्ज आहे.
Bigg Boss Marathi 4 Live Updates : तू चाल पुढं... डान्सच्या दुनियेतला सुपरस्टार विकास सावंत आता झळकणार 'बिग बॉस 4'मध्ये
Bigg Boss Marathi 4 Live Updates : डान्सच्या दुनियेतला सुपरस्टार विकास सावंत आता 'बिग बॉस 4'मध्ये झळकणार आहे.
View this post on Instagram
Bigg Boss Marathi 4 Live Updates : पुण्याची 'टॉकर'वडी अमृता देशमुख अन् मुंबईची ऑटो राणी यशश्री मसुरकर गाजवणार 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व; कोण ठरणार टॉप?
Bigg Boss Marathi 4 Live Updates : पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख आणि मुंबईची ऑटो राणी यशश्री मसुरकरची बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात एन्ट्री झाली आहे. दोघींमध्ये कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
