एक्स्प्लोर

Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत

Beed : बीड - परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या भीषण अपघातात 3 तरुण मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एस.टी. महामंडळाकडून त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची निर्देश देण्यात आले आहे.

मुंबई: बीड - परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला घोडका राजुरी येथील स्वराज हॉटेल जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये  (Accident) 3 तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत  वेदनादायक असून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. दुर्दैवाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची आयुष्य आपण परत आणू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला दुःखाचा डोंगर पाहता, फुल ना फुलाची पाकळी म्हणून एस.टी. महामंडळाकडून त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची निर्देश परिवहन मंत्री म्हणून मी एसटी प्रशासनाला दिली आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी दिली आहे.

बीड- परभणी मार्गावर पहाटे 6 च्या दरम्यान पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3 तरुण मुलांना एसटी बसची धडक बसली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव  करणारी मुले चालकाला दिसली नाहीत, असे चालकाचे म्हणणे आहे. दुर्दैवाने या अपघातामध्ये त्या तीनही मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बीड आणि परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. यावेळी एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि  व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बीडचे माजी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्याशी चर्चा करून मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या नातेवाईकांना एस.टी. तर्फे प्रत्येकी 10 लाखाची मदत देऊ केली आहे.  तसेच  शासनातर्फे त्यांच्या कुटुंबीयांना जे काय मदत करणे शक्य होईल, ती मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत. असे आश्वासन यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

नेमका कसा घडला अपघात?

बीड-परळी महामार्गावरील घोडका राजुरी जवळ एसटी बसने व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना उडवलं. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या या 3 तरुणांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तरुण नेहमीप्रमाणे आज (रविवारी) देखील सकाळच्या सुमारास व्यायाम करण्यासाठी गेले होते. यावेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना जोरदार धडक दिली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारी मुले चालकाला दिसली नाहीत, असे चालकाचे म्हणणे आहे. 

तर घटनेची माहिती मिळताच या जखमी तरुणांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तरुणांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. मात्र उपचारा दरम्यान या 3 तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Photos : जुने फोटो टाकून पोलिसांची दिशाभूल? प्रशांत कोरटकरचा प्रशासनाला चकवाABP Majha Headlines : 11 AM : 22 मार्च 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान : 22 March 2025 : ABP MajhaPune News : Sharad Pawar - Ajit Pawar एकाच  मंचावर येणार, जयंत पाटीलही उपस्थित ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Video : 'तुमचा भाऊ अजित पवार तुमच्या सोबत, जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळं दाखवेल, दोन गटात वाद निर्माण करेल, तो कोणीही असला, तरी त्याला सोडणार नाही'
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंसह 'या' विद्यमान खासदार-आमदारांना सहकार विभागाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
एनआयटी प्रोफेसर चेंबरमध्ये बोलवून विद्यार्थीनीला म्हणाला, पाय पसरून बस, मागून मान धरली; जांघेत हात घालत पोटावरूनही हात फिरवला
जान्वही कपूर, विद्या बालन ते नेहा धुपियाचा ग्लॅमरस लूक, एका क्लिकवर
जान्वही कपूर, विद्या बालन ते नेहा धुपियाचा ग्लॅमरस लूक, एका क्लिकवर
KKR vs RCB :  एकेकाळच्या केकेआरच्या स्टारवर RCB विश्वास टाकणार, कोहलीसोबत मोठी जबाबदारी, कोलकाताची होमग्राऊंडवर नाकेबंदी करण्याचा बंगळुरुचा डाव
केकेआरची साथ सोडलेल्या स्टारवरआरसीबी डाव लावणार, कोलकाताची नाकेबंदी करण्यासाठी बंगळुरुचं तगडं प्लॅनिंग
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Sanjay Raut : अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
अजितदादा-जयंत पाटील भेटीवर संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, यांचं उत्तम सुरु असतं, भेटीसाठी विविध...
Embed widget