एक्स्प्लोर

Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!

Deepak Kedar : संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींना हाल-हाल करून मारले. या दोन्हीही प्रकरणातील आरोपींना फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दीपक केदार यांनी दिलाय.

Deepak Kedar on Santosh Deshmukh Case : सैफ अली खानला दोन दिवसात न्याय कसा मिळतो? दया नायक कमरेला बंदूक लावून त्याच्या न्यायासाठी तिथे गेला, मग आम्हाला न्याय का नाही? असा सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार (Deepak Kedar) यांनी उपस्थित केलाय. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पालकमंत्रिपदावरून डावलण्यात आले. यावरून धनंजय मुंडे यांनी मी अजित पवार (Ajit Pawar) आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की, बीडच्या पालकमंत्रिपदी अजितदादांना जबाबदारी द्यावी, असे वक्तव्य केले होते. यानंतर दीपक केदार यांनी धनंजय मुंडेंवरही जोरदार हल्लाबोल केलाय. 

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाच्या सभेतून दीपक केदार म्हणाले की, माझ्यामुळे सगळं कंट्रोलमध्ये आहे. मला बोलू दिलं नाही तर लक्ष्मण हाके उड्या मारेल. मोर्चे निघाले नसते तर वाल्मिक कराडला मकोका लागला नसता. आज हे दोन्हीही कुटूंब उन्हात बसले आहेत. संतोष देशमुख यांना हाल-हाल करून मारले. सोमनाथ सूर्यवंशींना हाल-हाल करून मारले. या दोन्हीही प्रकरणातील आरोपींना फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. 

मग राजीनामाही देऊन टाका

धनंजय मुंडे म्हणतात मीच अजित पवारांना बीडचे पालकमंत्री व्हायला सांगितलं. मग राजीनामाही देऊन टाका, असे म्हणत धनंजय मुंडेच बीडचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत हे यातून दिसत असल्याचा आरोप दीपक केदार यांनी केला. सैफ अली खानला दोन दिवसात न्याय कसा मिळतो? दया नायक कमरेला बंदूक लावून त्याच्या न्यायासाठी तिथे गेला, मग आम्हाला न्याय का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

सामाजिक सलोखा तयार होत असल्याने हाकेंच्या पोटात दुखतंय

ते पुढे म्हणाले की, हा लक्ष्मण हाके, याला बरळेच्या दवाखान्यातील गोळ्यांची आवश्यकता आहे. हा म्हणतो मोर्चातून कोपर्डी - 2 येणार आहे. मोर्चा निघत असल्याने त्याची दुखत आहे. सामाजिक सलोखा तयार होत असल्याने त्याच्या पोटात दुखतंय, अशी टीका दीपक केदार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केली. सरकार या कुटुंबांना न्याय कधी देणार? माणुसकीला न्याय देण्यासाठी या मोर्चात सगळे यायला लागलेत. गुन्हेगाराचे वंशज देखील मोर्चात येत आहे, असे म्हणत त्यांनी वाल्मिक कराडसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर टीका केली. गुन्हेगारांचे भक्त वाढलेत, आम्ही मोर्चे काढले म्हणून हे गप्प बसलेत. आरोपीला फाशी होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार, असेही दीपक केदार म्हणाले.

आणखी वाचा 

Anandraj Ambedkar : मुख्यमंत्र्यांना सत्तेचा माज, बीड आणि परभणी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : आनंदराज आंबेडकर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप
Chhaava Movie Box Office Collection : भारत-पाकिस्तान सामन्याचा 'छावा'ला फटका; रविवार असूनही कमाई फक्त...
भारत-पाकिस्तान सामन्याचा 'छावा'ला फटका; रविवार असूनही कमाई फक्त...
Telangana Tunnel Accident : तेलंगणात 14 किमी अंतरावर बोगद्यात अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता कमीच, आतमध्ये 11 किमी पाणी भरले
तेलंगणात 14 किमी अंतरावर बोगद्यात अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता कमीच, आतमध्ये 11 किमी पाणी भरले
Udayanraje Bhosale birthday: आठ फुटांचा केक, चांदीचं सिंहासन अन् लाखोंच्या फटाक्यांची आतषबाजी; साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलीब्रेशन
उदयनराजेंच्या बर्थडेचा थाट पाहून येडे व्हाल! आठ फुटांचा केक, चांदीचं सिंहासन अन् लाखो रुपयांचे फटाके
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shiv Sena vs BJP Thane : Eknath Shinde यांच्या ठाण्यात भाजपचा जनता दरबार; Ganesh Naik EXCLUSIVEABP Majha Headlines : 09 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe vs Uddhav Thackeray : नीलम गोऱ्हेंविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना मैदानातManikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार? भवितव्याचा आज फैसला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: उपसभापती नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे सभागृहात लक्षवेधी लावायला पैसे घेतात; संतापलेल्या संजय राऊतांचा गंभीर आरोप
Chhaava Movie Box Office Collection : भारत-पाकिस्तान सामन्याचा 'छावा'ला फटका; रविवार असूनही कमाई फक्त...
भारत-पाकिस्तान सामन्याचा 'छावा'ला फटका; रविवार असूनही कमाई फक्त...
Telangana Tunnel Accident : तेलंगणात 14 किमी अंतरावर बोगद्यात अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता कमीच, आतमध्ये 11 किमी पाणी भरले
तेलंगणात 14 किमी अंतरावर बोगद्यात अडकलेल्या 8 मजूरांच्या वाचण्याची शक्यता कमीच, आतमध्ये 11 किमी पाणी भरले
Udayanraje Bhosale birthday: आठ फुटांचा केक, चांदीचं सिंहासन अन् लाखोंच्या फटाक्यांची आतषबाजी; साताऱ्यात उदयनराजे भोसलेंच्या वाढदिवसाचं ग्रँड सेलीब्रेशन
उदयनराजेंच्या बर्थडेचा थाट पाहून येडे व्हाल! आठ फुटांचा केक, चांदीचं सिंहासन अन् लाखो रुपयांचे फटाके
2025 Germany elections : जर्मनीत विरोधी कंझर्व्हेटिव्ह पार्टी आघाडीवर, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच कट्टर सनातन्यांचा अड्डा असलेल्या पक्षाची सुद्धा सरशी; एलाॅन मस्क, रशियाचा निवडणुकीत हस्तक्षेप
जर्मनीत विरोधी कंझर्व्हेटिव्ह पार्टी आघाडीवर, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच कट्टर सनातन्यांचा अड्डा असलेल्या पक्षाची सुद्धा सरशी; एलाॅन मस्क, रशियाचा निवडणुकीत हस्तक्षेप
Kolhapur News : वृद्धेच्या तोंडात बोळा कोंबून हत्या, अकरा तोळे सोन्यासाठी केला घात; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
वृद्धेच्या तोंडात बोळा कोंबून हत्या, अकरा तोळे सोन्यासाठी केला घात; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
NTPC Green Share : लॉक इन कालावधी संपताच एनटीपीसी ग्रीनच्या शेअरमध्ये घसरण, गुंतवणूकदारांकडून विक्री सुरु
NTPC Green Share : लॉक इन कालावधी संपताच एनटीपीसी ग्रीनचा शेअर गडगडला, किती रुपयांवर पोहोचला?
Ind vs Pak Champions Trophy 2025: 'या' पाच गोष्टी ठरल्या टर्निंग पॉईंट, पाकिस्तानला आरामात हरवून भारत कसा जिंकला?
'या' पाच गोष्टी ठरल्या टर्निंग पॉईंट, पाकिस्तानला आरामात हरवून भारत कसा जिंकला?
Embed widget