एक्स्प्लोर

Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार

सुटका करण्यात आलेल्या ओलिसांमध्ये रोमी गोनेन नावाच्या महिलेचाही समावेश आहे. तिचे नाव आणि फोटो समोर आला आहे. यापूर्वी शनिवारी इस्रायलच्या मंत्रिमंडळाने हमाससोबतच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली होती.

Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमास यांच्यातील 14 महिन्यांच्या युद्धानंतर युद्धविराम लागू झाला आहे. नियोजित वेळेपासून सुमारे 3 तासांचा विलंब झाला. सकाळी 11.30 वाजता लागू होणार होता, मात्र दुपारी 2:45 वाजता लागू झाला. इस्रायलने हमासवर युद्धविरामाच्या अटींचे पालन न केल्याचा आरोप केला असून आज सोडण्यात आलेल्या तीन इस्रायली ओलीसांची नावे हमासने दिलेली नाहीत, असे म्हटले आहे. यानंतर हमासने आज सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची यादी इस्रायलला पाठवली, त्यानंतर युद्धविराम लागू झाला. आजपासून लागू झालेल्या युद्धबंदी अंतर्गत हमास पहिल्याच दिवशी 3 इस्रायली ओलीसांची सुटका करणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता ते सोडले जातील.

सुटका करण्यात आलेल्या ओलिसांमध्ये रोमी गोनेन नावाच्या महिलेचाही समावेश आहे. तिचे नाव आणि फोटो समोर आला आहे. यापूर्वी शनिवारी इस्रायलच्या मंत्रिमंडळाने हमाससोबतच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली होती. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे.

इस्रायलने 700 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली

युद्धविराम करार 3 टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या 33 ओलिसांची सुटका करणार आहे. तसेच, इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर मागे हटणार आहे. इस्रायलमधील न्याय मंत्रालयाने 95 पॅलेस्टिनी कैद्यांची यादीही जारी केली आहे, ज्यांची पहिल्या टप्प्यात सुटका केली जाईल. यामध्ये 69 महिला, 16 पुरुष आणि 10 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. इस्रायल 700 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार आहे. त्यांच्या नावांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट असलेले अनेक लोक हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, ज्यात हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे सदस्य आहेत. हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये प्रवेश केला, 1200 लोकांना ठार केले आणि 251 लोकांना ओलीस ठेवले. त्यानंतर काही तासांनी इस्रायली सैन्याने गाझावर हल्ला केला.

युद्धविराम करार तीन टप्प्यात पूर्ण होईल

15 जानेवारी रोजी जो बिडेन म्हणाले की हा करार 19 जानेवारीपासून म्हणजे रविवारपासून तीन टप्प्यांत सुरू होईल. यामध्ये 42 दिवस ओलिसांची अदलाबदल केली जाईल. गाझामध्ये 19 जानेवारी ते 1 मार्चपर्यंत संपूर्ण युद्धविराम असेल. हमास 33 इस्रायली ओलीस सोडणार आहे. इस्रायल आपल्या एका ओलिसाच्या बदल्यात दररोज 33 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल. प्रत्येक इस्रायली महिला सैनिकामागे 50 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल. पहिल्या टप्प्याच्या 16व्या दिवशी म्हणजे 3 फेब्रुवारीपर्यंत सर्व काही सुरळीत राहिल्यास दुसऱ्या टप्प्याच्या योजनेवर चर्चा सुरू होईल. या काळात कोणताही हल्ला केला जाणार नाही. जिवंत राहिलेल्या ओलिसांची सुटका केली जाईल. इस्रायल 1,000 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करेल, ज्यात 15 वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या सुमारे 190 कैद्यांचा समावेश आहे.

ओलीसांचे मृतदेहही इस्रायलकडे सोपवले जाणार

या कराराच्या शेवटच्या टप्प्यात गाझाचे पुनर्वसन केले जाईल. यासाठी 3 ते 5 वर्षे लागतील. हमासने मारलेल्या ओलीसांचे मृतदेहही इस्रायलकडे सोपवले जाणार आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान नेतन्याहू यांच्या लिकुड पक्षाचे मंत्री डेव्हिड अम्सालेम आणि अमिचाई चिकली हे युद्धबंदीच्या विरोधात मतदान करणाऱ्या 8 मंत्र्यांमध्ये होते. याशिवाय सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या ओत्झ्मा येहुदित पक्षाच्या 6 मंत्र्यांनीही युद्धबंदीच्या विरोधात मतदान केले. याआधी शुक्रवारी इस्रायलचे सुरक्षा मंत्री आणि उजव्या विचारसरणीचे नेते बेन-गवीर इटामार यांनी हमाससोबतच्या युद्धविराम कराराला विरोध केला होता. करार मंजूर झाल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी त्यांनी दिली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : 'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
Maharashtra News LIVE Updates :  भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
Maharashtra News LIVE Updates : भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
Taarak Mehta Fame Jheel Mehta Wedding: 'तारक मेहता...' फेम सोनू अडकली पु्न्हा लग्नबंधनात, तीन महिन्यांतच दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; म्हणाली...
'तारक मेहता...' फेम सोनू अडकली पु्न्हा लग्नबंधनात, तीन महिन्यांतच दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; म्हणाली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election Maharashtra | विधान परिषदेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 17 March 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स100 Headlines : शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane : 'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
'माझे दोन्ही पुत्र कर्तृत्ववान हे माझं भाग्य'; खासदार नारायण राणेंकडून भर सभेत दोन्ही मुलांचे तोंडभरून कौतुक 
Maharashtra News LIVE Updates :  भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
Maharashtra News LIVE Updates : भाजपचं ठरलं, सेना राष्ट्रवादी विधानपरिषदेवर कुणाला संधी देणार?
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
Taarak Mehta Fame Jheel Mehta Wedding: 'तारक मेहता...' फेम सोनू अडकली पु्न्हा लग्नबंधनात, तीन महिन्यांतच दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; म्हणाली...
'तारक मेहता...' फेम सोनू अडकली पु्न्हा लग्नबंधनात, तीन महिन्यांतच दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; म्हणाली...
Beed Crime: बीडमध्ये अंगावर काटा आणणारी घटना, प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला जीव जाईपर्यंत मारलं, अंगावर काळे-निळे वळ
मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, बीडमध्ये तरुणाला शरीर काळनिळं पडेपर्यंत मारलं, अखेर जीव सोडला
Chhaava Box Office Collection Day 31: 'छावा'ची जबरदस्त कमाई; बॉलिवूडच्या टॉप-2 फिल्म्समध्ये सामील होण्याची तयारी, आतापर्यंतच्या कमाईचा आकडा ऐकला?
'छावा'ची जबरदस्त कमाई; बॉलिवूडच्या टॉप-2 फिल्म्समध्ये सामील होण्याची तयारी, आतापर्यंतच्या कमाईचा आकडा ऐकला?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
Embed widget