Tehran Movie : जॉन अब्राहमने सुरु केले ‘तेहरान’चे शूटिंग, चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला!
Tehran Movie : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने त्याचा आगामी चित्रपट 'तेहरान'चे (Tehran) शूटिंग सुरू केले आहे.

Tehran Movie : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स'(Ek Villain Returns) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आता जॉनने त्याचा आगामी नवीन चित्रपट 'तेहरान'चे (Tehran) शूटिंग सुरू केले आहे. मॅडॉक फिल्म्स अंतर्गत बनणाऱ्या ‘तेहरान’ या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. नुकताच याचा टीझर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये जॉन खूपच इंटिमेट लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन करत आहेत.
जॉन अब्राहमने निर्माता दिनेश विजयन यांच्या ‘तेहरान’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, याची माहिती चित्रपट निर्मिती कंपनीने सोमवारी दिली. 'मॅडॉक फिल्म्स'च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. चित्रपटातील जॉन अब्राहमच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक रिलीज करण्यासाठी प्रोडक्शन कंपनीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, ‘तेहरानचे शूटिंग सुरू झाले’.
पाहा पोस्ट :
दिनेश विजन, संदीप लेजेल आणि शोभना यादव यांनी ‘तेहरान’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा रितेश शाह आणि आशिष वर्मा यांनी लिहिली आहे. दिनेश विजन, संदीप लेजेल आणि शोभना यादव यांनी ‘तेहरान’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा रितेश शाह आणि आशिष वर्मा यांनी लिहिली आहे. 'तेहरान' चित्रपटाची कथा सत्य घटनेपासून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे.
'एक व्हिलन रिटर्न्स'चीही चर्चा!
सध्या जॉन त्याच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यात अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांच्या भूमिका आहेत. 'एक विलेन रिटर्न्स' या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाल्याने प्रेक्षक आता चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 29 जुलैला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. मोहित सूरीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. हा चित्रपट 2014 साली रिलीज झालेल्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरच्या ‘एक व्हिलन’चा सिक्वेल आहे.
संबंधित बातम्या
Ek Villain Returns First Poster: 'एक व्हिलन रिटर्न्स'चे पोस्टर आऊट; लवकरच सिनेमा होणार रिलीज
Ek Villan Returns: दिशा पाटणी अन् जॉन अब्राहमची जमली जोडी! ‘एक व्हिलन रिटर्न्स’चं धमाकेदार पोस्टर पाहिलंत का?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
