एक्स्प्लोर
PM Kisan : 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 येणार, नरेंद्र मोदी पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करणार, 21000 कोटी पाठवणार
PM Kisan : पीएम किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे. आज शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतील.
पीएम किसान
1/5

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. नरेंद्र मोदी बिहारमधील भागलपूर येथील कार्यक्रमातून 2000 रुपयांचं वितरण करतील. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
2/5

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 19 व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात येईल. देशभरातील जवळपास 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पाठवण्यात येईल.
3/5

पीएम किसान सन्मान निधी योजनेला आता सहा वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांना आमंत्रित करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
4/5

पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्यांचे 36000 रुपये मिळाले आहेत. आज 19 वा हप्ता मिळणार आहे.
5/5

देशभरातील 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणं 21000 कोटी रुपये पाठवले जाणार आहेत. पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. मात्र, शेतकऱ्यांना ई केवायसी, फार्मर रजिस्ट्रेशन, बँक खात्याचा डीबीटी पर्याय सुरु करणे आणि जमीन पडताळणी करुन घेणं आवश्यक आहे.
Published at : 24 Feb 2025 07:19 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























