Maharashtra Live Updates: विद्रोही साहित्य संमेलनात धंनजय मुंडेंच्या राजीनामाबाबत ठराव
Maharashtra Live Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या भेटीची चर्चा.

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates: 3 मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज महाकुंभमेळ्यात स्नानासाठी प्रयागराजला जाणार आहेत. महाराष्ट्रात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा. मुंबईतील एका विवाहसोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीची चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रारीची कोर्टात सुनावणी. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर...
डोक्यात गोळी झाडून सीआरपीएफ जवानाची आत्महत्या
गडचिरोलीच्या धानोरा येथील सीआरपीएफ कॅम्पमध्ये कार्यरत जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. गिरीराज राम नरेश किशोर (30) रा. आग्रा असे जवानाचे नाव आहे. गिरीराज हे धानोरा येथे 113 बटालियन मध्ये कार्यरत होते. सुट्ट्या संपल्यानंतर तीन दिवसांपूर्वीच ते कर्तव्यावर रुजू झाले होते. दरम्यान आज सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याने त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मंत्री माणिकराव कोकटेंनी सांगितला महायुतीतला कामाचा फॉर्मेट
माणिकराव कोकटेंनी सांगितला महायुतीतला कामाचा फॉर्मेट, कोकटेंच मोठं वक्तव्य
निवडून आल्यावर मुख्यमंत्र्यांनी दम दिला आणि 100 दिवसाचा कार्यक्रम दिला
मस्ती कराल तर घरी जा
पीएस आणि ओएसडी मुख्यमंत्री ठरवतात
आमच्याही हातात काही राहील नाही
आता आम्हाला चांगला काम कराव लागेल






















