Ek Villain Returns First Poster: 'एक व्हिलन रिटर्न्स'चे पोस्टर आऊट; लवकरच सिनेमा होणार रिलीज
Ek Villain Returns First Poster : अर्जुन कपूर आणि तारा सुतारियाचा आगामी सिनेमा 'एक व्हिलन रिटर्न्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ek Villain Returns First Poster : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि तारा सुतारियाचा (Tara Sutaria) आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. पोस्टरमध्ये अर्जुन आणि तारा सुतारियाचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
'एक व्हिलन रिटर्न्स' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मोहित धुरीने सांभाळली आहे. या सिनेमात अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाच्या पोस्टरमध्ये अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. अर्जुन आणि तारा दोघांनीही सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
View this post on Instagram
30 जूनला ट्रेलर होणार आऊट
'एक व्हिलन रिटर्न्स' या सिनेमाचा ट्रेलर 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर 29 जुलैला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा 2014 साली रिलीज झालेल्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूरचा सिक्वेल आहे. प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'एक व्हिलन रिटर्न्स' हा सिनेमा 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन'चा सिक्वेल आहे. 'एक व्हिलन' सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. तर 'एक व्हिलन रिटर्न्स' सिनेमात जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या