Happy Birthday Monalisa : शेकडो सिनेमे ते कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाबद्दल...
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा आज 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
![Happy Birthday Monalisa : शेकडो सिनेमे ते कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाबद्दल... Happy Birthday Monalisa Hundreds of movies to crores Know about bhojpuri actress Monalisa Happy Birthday Monalisa : शेकडो सिनेमे ते कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाबद्दल...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/21/a090e52f0e47e415ded63e33937517bc1669000528823254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Monalisa : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रीपैकी एक आहे. आज ती तिचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोनालिसा तिच्या सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.
मोनालिसा आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'तौबा तौबा' (Tauba Tauba), 'मनी है तो हनी है' (Money Hai Toh Honey Hai), 'भोले शंकर' (Bhole Shankar), 'सात सहेलिया' (Saat Saheliya) यांसारख्या अनेक सिनेमांत मोनालिसाच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. सिनेमांसह तिने मालिकांमध्येदेखील काम केलं आहे.
मोनालिसा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. इंस्टाग्रामवर तिचे 5 मिलिअनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत मोनालिसाने 100 सिनेमांत काम केलं आहे. तसेच 'बिग बॉस' आणि 'नच बलिये' या कार्यक्रमांतदेखील ती दिसून आली आहे.
View this post on Instagram
मोनालिसाने 1997 साली 'जयते' या हिंदी सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण तिचा पहिला सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला. त्यानंतर तिने 'कहॉं जईबा राजा नजरिया लडाईके' या भोजपुरी सिनेमात काम केलं. 'कहॉं जईबा राजा नजरिया लडाईके' या सिनेमामुळे मोनालिसाला ओळख मिळाली. त्यानंतर मोनालिसाने भोजपुरीसह तेलुगू, बंगाली सिनेसृष्टीतही काम केलं. मोनालिसाने 'रात्री के यात्री 2' या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे.
मोनालिसा वयाच्या 40 व्या वर्षातही चाहत्यांना घायाळ करत असते. मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तिने तिचं नाव बदललं. मोनालिसाची एकूण संपत्ती 18 कोटींच्या आसपास आहे. एका सिनेमासाठी ती सात ते 10 लाख मानधन घेते.
संबंधित बातम्या
Happy Birthday Rajkumar Hirani : चित्रपट दिग्दर्शनाची परिभाषा बदलणारे राजकुमार हिरानी; प्रत्येक सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)