Happy Birthday Rajkumar Hirani : चित्रपट दिग्दर्शनाची परिभाषा बदलणारे राजकुमार हिरानी; प्रत्येक सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
Rajkumar Hirani : सिने-निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक राजकुमार हिरानी यांचा आज वाढदिवस आहे.
Rajkumar Hirani : सिने-निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांचा आज साठावा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि चतुरस्त्र दिग्दर्शक अशी राजकुमार हिरानी यांची ओळख आहे. त्यांनी आजवर पाच सिनेमांचं दिग्दर्शन केलं असून त्यांचा प्रत्येक सिनेमा हिट ठरला आहे.
राजकुमार हिरानी यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तर 11 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आतापर्यंत पाच सिनेमे बनवले असून पाचही सुपरहिट ठरले आहेत. यात 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', '3 इडियट्स', 'पीके' आणि 'संजू' ब्लॉकबस्टर सिनेमांचा समावेश आहे.
20 नोव्हेंबर 1962 रोजी नागपुरातील सिंधी कुटुंबात जन्मलेल्या राजकुमारी हिरानी यांना राजू हिरानी असेही म्हटले जाते. राजकुमार डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण राजकुमार यांना अभ्यासाची आवड नव्हती. त्यामुळे त्यांनी पुण्याच्या टेलिव्हिजन इन्सिट्ट्यूटमध्ये प्रवेश घेतला. यादरम्यान त्यांनी दिग्दर्शन आणि जाहिरात क्षेत्रात काम केलं. अनेक सिनेमांचे प्रोमो बनवले.
पहिलाच सिनेमा सुपरहिट!
राजकुमारी हिरानी यांचा सिनेसृष्टीतील प्रवास खऱ्या अर्थाने 2003 साली सुरू झाला. 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला सिनेमा. संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि या सिनेमामुळे राजकुमार हिरानी घराघरांत पोहोचले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' हा सिनेमा बनवला.
राजकुमारी हिरानी यांचा '3 इडियट्स' हा सिनेमा 2009 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमादेखील चांगलाच गाजला. त्यानंतर राजकुमार यांचे चाहते त्यांच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करू लागले. तब्बल पाच वर्षांनी त्यांचा 'पीके' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने संपूर्ण देशाला वेड लावले. त्यानंतर त्यांचा 'संजू' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यश मिळाले.
कोट्यवधींचा मालक राजकुमार हिरानी
राजकुमार हिरानी यांची एकूण संपत्ती तेराशे कोटींच्या आसपास आहे. तसेच नवी मुंबईत त्यांचे आलीशान घर आहे. या घराची किंमत 12 कोटी आहे. राजकुमार हिरानी यांच्याकडे लग्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे.
संबंधित बातम्या