एक्स्प्लोर

Ajay Devgn First Look Singham Again Movie : काश्मीरमधील नव्या मिशनवर बाजीराव सिंघम; अजय देवगणचा सिंघम अगेनमधील फर्स्ट लूक आउट

Ajay Devgn First Look Singham Again Movie : 'सिंघम अगेन'मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अजय देवगण हा त्याच्या जुन्या बाजीराव सिंघमच्या लूकमध्ये दिसत आहे.

Ajay Devgn First Look Singham Again : अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. या चित्रपटाचे सध्या शूटिंग सुरू आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) त्याच्या कॉप युनिव्हर्स सीरिजमधील चित्रपटाबद्दल चाहत्यांना अपडेट देत असतो.आता, 'सिंघम अगेन'मधील अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये अजय देवगण हा त्याच्या जुन्या बाजीराव सिंघमच्या लूकमध्ये  दिसत आहे.

कसा आहे अजय देवगणचा फर्स्ट लूक?

रोहित शेट्टीचा सिंघम अगेन हा चित्रपट या वर्षातील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, करीना कपूर आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी अजय देवगणचेही प्रयत्न सुरू आहेत. दिग्दर्शक रोहित शेट्टीने अजय देवगणचा फर्स्ट लूक पोस्ट केला आहे. या लूकमध्ये आधीच्या बाजीराव सिंघमचा दरारा दिसून येत आहे. 

रोहित शेट्टीने फोटो शेअर करताना काय म्हटले?

रोहित शेट्टीने शेअर केलेल्या फोटोमध्ये अजय देवगण जवळ लष्कराचे काही जवान उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्या हातात शस्त्रे दिसत आहे. तर, सभोवताली बर्फाच्छिद पर्वत दिसत आहे. रोहित शेट्टीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, बाजीराव सिंघम एसएसपी एसओजी स्पेशल ऑपरेशन ग्रुप सोबत. जम्मू-काश्मीर पोलीस...सिंघम अगेन...लवकरच. 

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

मागील काही दिवसांपासून 'सिंघम अगेन' चित्रपटाचे चित्रीकरण जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगण हे लष्कराच्या जवानांसोबत बसलेले होते. 

कधी रिलीज होणार सिंघम अगेन?

सिंघम अगेन हा चित्रपट  सिंघम सीरीजमधील तिसरा चित्रपट आहे. रोहित शेट्टी कॉप युनिर्व्हसमधील हा पाचवा चित्रपट आहे. याआधी सिंघम अगेन हा 15 ऑगस्ट रोजी झळकणार होता. पण, सध्या या चित्रपटाची रिलीज पुढे ढकलण्यात आली असल्याचे वृत्त आहे. दिवाळीत हा चित्रपट रिलीज होईल अशी चर्चा आहे. 

अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत... 

या चित्रपटात अर्जुन कपूर हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन कपूरने आपले चित्रीकरण पूर्ण केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget