Adah Sharma : अदा शर्माचा हटके एअरपोर्ट लूक, नेसली आजीची 65 वर्षे जुनी साडी
Adah Sharma : अभिनेत्री अदा शर्माचा एअरपोर्ट लूक सध्या व्हायरल होत असून यावेळी तिने तिच्या आजीची 65 वर्षे जुनी साडी नेसली आहे.
मुंबई : 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटातून अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ही प्रेक्षकांच्या भेटीला आली. नुकताच अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असलेला तिचा बस्तर या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांनी पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यात प्रकाशझोतात आलेली अदा शर्मा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवते.
अदाचा चाहता वर्ग आता मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. नुकतच अदा शर्मा ही पापाराझीच्या कॅमऱ्यामध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली. कोणत्याही सेलिब्रिटीचा एअरपोर्ट लूक हा त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. सेलिब्रिटींचा हा एअरपोर्ट लूक हा खूप व्हायरल देखील होतो. अभिनेत्री अदा शर्मा हीचा हाच एअरपोर्ट लूक सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. कारण अदा शर्माने तिच्या आजीची साडी यावेळी नेसल्याचं पाहायला मिळालं.
'ही माझ्या आजीची साडी'
अदा शर्माने हीने एअरपोर्टवर तिच्या आजीची 65 वर्ष जुनी साडी नेसली होती. अदा एअरपोर्टवर आल्यानंतर तिच्या साडीचे कौतुक करण्यात आले. त्यावेळी ही माझ्या आजीची साडी असल्याचं अदाने सांगितलं. आजी जेव्हा 25 वर्षांची होती, तेव्हा तिने ही साडी नेसली होती. आता ती 90 वर्षांची आहे. तिची ही 65 वर्ष जुनी साडी असल्याचं देखील अदानं यावेळी सांगितलं.
View this post on Instagram
अदा शर्माचा 'बस्तर' चित्रपट येणार भेटीला
वर्ष 2023 मध्ये वादग्रस्त ठरलेला 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटातील अदा शर्मा (Adah Sharma), सुदिप्तो सेन आणि विपुल शाह यांचे त्रिकूट पुन्हा एकदा परतले आहे. शहरी नक्षलवाद, नक्षलवादाच्या मुद्यावर भाष्य करणाऱ्या बस्तर या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. तसेच हा चित्रपट 15 मार्च रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये नक्षलवाद्यांवर टीका करताना अदा शर्मा साकारत असलेली व्यक्तीरेखा उदारमतवादी, डाव्या विचारांच्या लोकांना भरचौकात गोळ्या घालू असे चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसत आहे.