एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Esha Deol Divorce : भरत तख्तानी सोबतच्या 12 वर्षाच्या संसाराचा काडीमोड का झाला? ईशा देओलने म्हटले, त्याच्यासाठी मी...

Esha Deol latest News: ईशा आणि भरत यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. आता दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.. ईशा देओलने आपल्या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे.

Esha Deol Divorce :  बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने (Esha Deol) भरत तख्तानीसोबत (Bharat Takhtani) सुरू असलेला संसाराचा प्रवास 12 वर्षानंतर थांबवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी दोघांनी एक निवेदन जारी करत घटस्फोट घेणार असल्याचा निर्णय जाहीर केला. मागील काही महिन्यांपासून या घटस्फोटाच्या निर्णयाची चर्चा सुरू होती. आता या घटस्फोटामागील कारण समोर आले आहे.

वैवाहिक आयुष्यात वादळ सुरू असल्याची होती चर्चा

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळं सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. गेल्या वर्षी जूनमध्ये तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ईशाने सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले होते आणि तिच्या पतीवरील अपार प्रेमही व्यक्त केले होते. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला भरत उपस्थित नव्हता किंवा ईशाच्या वाढदिवसालाही तो उपस्थित नव्हता तेव्हापासून त्यांच्या नात्यातील मतभेदाच्या अफवा सुरू झाल्या होत्या. या निमित्ताने दोघांमध्ये सर्व काही सुरळीत होत नसल्याची चर्चा रंगू लागली होती.

ईशाने सांगितले घटस्फोटाचे कारण... 

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ईशा देओलचा एक मुलाखत व्हायरल होत आहे. तिने यात घटस्फोटाचे संकेत दिले होते. ईशाने सांगितले की, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर भरत माझ्यावर चिडचिड करत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांना वाटत की माझं त्यांच्याकडे लक्ष नाही. नवऱ्याला असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण त्यावेळी राध्याचे प्लेस्कूल आणि मिरायाचे संगोपन यामध्ये मी अधिक व्यस्त होती. त्याशिवाय, मी एका पुस्तकात लेखनात आणि आमच्या प्रोडक्शनच्या मीटिंगमध्ये खूपच व्यस्त होती. त्यामुळे मी  दुर्लक्ष करत असावे असे भरतला वाटले असावे असे ईशाने म्हटले. 

ईशाने स्वत: ला ठरवले जबाबदार... 

ईशाने सांगितले की, पती भरत दूर जाण्याचे कारण स्वत: आहे. मला आठवतं की ज्यावेळी भरतने माझ्याकडे एक नवीन टूथब्रश मागितला होता आणि ही गोष्ट मी विसरून गेली, त्यांच्या कपड्यांना इस्री करून द्यायला विसरत होती, त्याच्या लंच बॉक्समध्ये काय हवंय, काय नकोय याकडे माझं दुर्लक्ष होऊ लागले. मी जर त्याची काळजी घेत नसेल तर याचा अर्थ आहे, की काहीतरी गडबड आहे. 

दोन मुलींचे पालक आहेत ईशा आणि भरत

ईशा आणि भरत यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. आता दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशाने 29 जून 2012 रोजी भरत तख्तानी सोबत विवाह केला होता. मुंबईतील इस्कॉन मंदिरात दोघांचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला होता. वर्ष 2017 मध्ये त्यांना राध्या ही पहिली मुलगी झाली. त्यानंतर 2019 मध्ये दुसरी मुलगी मिराया हिचा जन्म झाला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलंABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Embed widget