
Taarak Mehta ka Ooltah Chashmah show : अखेर प्रतीक्षा संपली! 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत नव्या 'तारक मेहता'ची एन्ट्री; प्रोमो पाहिलात?
अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) हे या मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारत होते. आता त्यांची भूमिका अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) हा साकारणार आहे.

Taarak Mehta ka Ooltah Chashmah show : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. 28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. या कलाकारांना काही नवे कलाकार रिप्लेस करणार आहेत.
अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) हे या मालिकेत तारक मेहता ही भूमिका साकारत होते. आता त्यांची भूमिका अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) हा साकारणार आहे. नुकताच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नव्या तारक मेहतांची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. 'कोण करत आहे गणपती बाप्पाची आरती? पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या नव्या एपिसोडमध्ये' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे. या प्रोमो व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट केली आहे.
पाहा प्रोमो
View this post on Instagram
या कलाकारांनी घेतला मालिका सोडण्याचा निर्णय घेतला
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेलता होता. तसेच दया ही भूमिका साकारणाऱ्या दिशा वकानी यांनी देखील मालिका सोडली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
